शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

व्हेंटिलेटर न लावल्याने कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 06:17 IST

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८०० रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधित महिला रुग्णाचे बुधवारी सायंकाळी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने निधन झाले, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संबंधित महिला खूप गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. त्यांचा रक्तदाब कमी होता, त्यामुळे व्हेंटिलेटर लावणे शक्य नव्हते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय बोदाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याने आरोग्य विभाग कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यात मागील आठवड्यात ६२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यामध्ये ग्रामीण भागात ३३, तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात २९ रुग्णांवर उपचार सुरू होते. मागील आठवड्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी ७ रुग्ण तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात ५ रुग्ण दररोज आढळून येत होते. तर या आठवड्यात ग्रामीण भागात १ तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात ८ असे एकूण ९ रुग्ण दररोज आढळून येत आहेत.

बुधवारी दुपारी बोईसर शासकीय टीमा रुग्णालयात वाळवा गावातील एका ५५ वर्षीय महिलेला  श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना पालघर रुग्णालयात हलविण्यात आले. तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू असताना त्यांचा त्रास वाढू लागला हाेता.

दिवसभरात कोरोनाचे ८०० रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसते आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ दिसून येत आहे. राज्यात गुरुवारी ८०३ रुग्णांची नोंद झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या