शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

एसटी संपादरम्यान बसवाहकाचा मृत्यू, अकोले येथील घटना, रावतेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:41 IST

ऐन दिवाळीतच सर्व एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. संपाच्या दुस-या दिवशी, बुधवारी अकोले आगाराच्या बसवाहकाचे हृदयविकाराने निधन झाले.

अकोले (जि. अहमदनगर) : ऐन दिवाळीतच सर्व एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. संपाच्या दुस-या दिवशी, बुधवारी अकोले आगाराच्या बसवाहकाचे हृदयविकाराने निधन झाले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या भावाने केली आहे.एकनाथ विठ्ठल वाकचौरे (५२) असे मृताचे नाव आहे. वाकचौरे बुधवारी सकाळपासून आंदोलनात बसून होते. दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बसस्थानकाजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परिवहन मंत्री रावते यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एकनाथ यांचे भाऊ वसंत वाकचौरे यांनी एका पत्राद्वारे केली. तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार नातेवाइकांनी केला. तणाव निवळल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.आमदार संजय कदमांवर गुन्हा दापोली (जि. रत्नागिरी) : एसटी कर्मचाºयांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यासह काहीजणांवर दापोली पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संपावर तोडगा काढण्याऐवजी सरकार दडपशाही करत आहे. पुतळा दहन प्रकरणी पोलिसांनी सत्ताधाºयांच्या दबावाखाली गुन्हा नोंदवला आहे. जनहितासाठी असे शंभर गुन्हे अंगावर घेऊ, असे आ. संजय कदम म्हणाले.पर्यायी खासगी बस अडवल्या : मुंबई : लक्ष्मीपूजनासाठी गावी जाणाºया भाविकांची खासगी वाहनचालकांनी मोठी लूट केली. बुधवारी सकाळी अ‍ॅप बेस टॅक्सी चालवणाºया कंपनीकडून परळ येथून मुंबई-पुणे मार्गासाठी दोन बस रवाना करण्यात आल्या. मात्र या बस वाशी आणि चेंबूर येथे अडवण्यात आली. परिणामी संबंधित मालकांनी आणखी बस न सोडण्याचा निर्णय घेतला.एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनात वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू झाला आहे. हा सरकारच्या दडपशाहीमुळे झालेला मृत्यू आहे.- राधाकृष्ण विखेपाटील, विरोधीपक्ष नेते, विधानसभा

टॅग्स :ST Strikeएसटी संपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार