पुणे : स्वाइन फ्लूमुळे बुधवारी पुण्यात दोघांचा मृत्यू झाला असून या वर्षात या आजाराने पुण्यातील बळींची संख्या ८९ वर पोहोचली. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या आणखी एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तापमान वाढत असल्याने स्वाइन फ्लूचे रुग्ण गेल्या महिन्याभरापासून कमी झाले आहेत. १ जानेवारीपासून आजपर्यंत शहरातील तब्बल १ लाख ८६ हजार १८५ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १८ हजार ५८४ संशयितांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले आहे. त्यापैकी ८१४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूमुळे पुण्यात दोघांचा मृत्यू
By admin | Updated: May 21, 2015 02:30 IST