शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 22:08 IST

 लग्नाच्या मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मिरजेत घडली

 सांगली, दि. 12 -   लग्नाच्या अक्षतांना केवळ तीन तास राहिले असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे या नवरदेवाचे नाव आहे. हृदविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.

मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील तरुणीसोबत ठरवण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हळदी समारंभ पार पाडला. शनिवारी मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. सकाळी व-हाडासह सर्व नातेवाईक मंगल कार्यालयामध्ये दाखल झाले होते. 

रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. मित्र व नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. 9 वाजण्याच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरु होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. त्यांना शोक अनावर झाला.