शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात कुपोषणामुळे तीन महिन्यांत ११९ बालकांचे मृत्यू

By admin | Updated: July 22, 2016 22:03 IST

मेळघाटात गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे उपजतमृत्यूंसह ११९ पालकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बंड्या साने यांनी दिली आहे.

- विशेष धोरण आखण्याची मागणी

मुंबई : मेळघाटात गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे उपजतमृत्यूंसह ११९ पालकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बंड्या साने यांनी दिली आहे. तरी सरकारने कुपोषणासाठी विशेष धोरण आखण्याची मागणी साने यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.साने म्हणाले की, मेळघाटात आरोग्य केंद्रांची वानवा असून उपलब्ध केंद्रातही पुरेसे डॉक्टर नाहीत. परिणामी २०१५-१६ सालात मेळघाटात कुपोषणामुळे ५२८ बालकांना जीव गमवावा लागला. यामधील उपजत मृत्यूंची संख्या १००हून जास्त आहे. एप्रिल ते जून महिन्यांत १० मातामृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मेळघाटातील कुपोषणमुक्तीसाठी शासनाने तातडीने उपाययोजना आखण्याची गरज आहे. मात्र अद्यापही येथील कुपोषणप्रश्नी सरकार म्हणावे तितके गंभीर नसल्याचे साने यांचे म्हणणे आहे.१९९३ साली विरोधी बाकावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेळघाटात जाऊन कुपोषणाची माहिती घेतली होती. प्रश्नाची गंभीरता जाणल्यानंतर फडणवीस यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात सरकारविरोधात याचिकाही दाखल केली. मात्र युतीचे सरकार आल्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा युती सरकारचा सत्तेवरून पायउतार झाला आणि भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आत्तापर्यंत भाजपने कुपोषणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात दोनवेळा याचिका दाखल केली. मात्र गेल्या वीस वर्षांपासून या प्रश्नावर बाजू मांडणारे भाजपचे वकील आत्ता छत्तीसगड महाधिवक्ता म्हणून काम करत आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांत ते याप्रकरणी होणाऱ्या सुनावणीस सतत गैरहजर राहत आहेत. सत्तेत नसताना कुपोषणाचे राजकारण करत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्यानंतर मात्र चिडीचुप दिसतअसल्याचे त्यांनी सांगितले.मेळघाटाला दिलासा मिळणार का?राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आत्तापर्यंत मेळघाटाला तीनवेळा भेट दिली. मात्र तरीही येथील कुपोषणाचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण आहे. याउलट केसरकर यांच्या भेटीनंतर येथील टेलिमेडिसन सेवा बंद झाल्याचे साने यांचे म्हणणे आहे.एकंदरीतच कुपोषणाच्या प्रश्नावर विरोधी बाकावर असतानाही दाखवली जाणारी तळमळ, सत्तेवर आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवावी. तसेच विशेष धोरण आखून येथील कुपोषण निर्मूलनाचा ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणीही साने यांनी केली आहे.