शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चर बुजविण्यासाठी मुदतवाढ

By admin | Updated: May 16, 2017 02:31 IST

खडीच्या तुटवड्यामुळे खोदलेल्या रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी उरकण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. त्यात उपयोगिता सेवा कंपन्यांच्या कामांनी डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खडीच्या तुटवड्यामुळे खोदलेल्या रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी उरकण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. त्यात उपयोगिता सेवा कंपन्यांच्या कामांनी डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे या कंपन्यांना चर बुजविण्यासाठी पालिकेने चार दिवसांची मुदत दिली आहे, तसेच चर खोदण्यास देण्यात आलेली परवानगी ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.दरवर्षी मुंबईत सुमारे चारशे कि़ मी. रस्ते विविध उपयोगिता सेवा कंपन्या खोदत असतात. नवीन केबल्स टाकणे किंवा दुरुस्तीसाठी गॅस कंपन्या, वीज कंपन्या अशा सुमारे २८ उपयोगिता सेवा कंपन्या खोदकाम करीत असतात. मात्र, या कंपन्या काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते पूर्ववत करताना त्यात त्रुटी ठेवतात. त्यामुळे असे खोदकाम पालिकेसाठी डोकेदुखीचे ठरते, परंतु त्यातून मिळणारा महसूल आणि या सेवांची मागणी असल्याने, त्यांना परवानगी देणे पालिकेला क्रमप्राप्त ठरते.मात्र, नवी मुंबईतील दगड उत्खननावर बंदी आल्यामुळे खडीचा पुरवठा बंद झाला आहे. याचा फटका रस्तेकामांना बसला आहे. ही कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करणे पालिकेसाठी आव्हानच ठरणार आहे. त्यात उपयोगिता सेवा कंपन्यांनी खोदलेले चर या अडचणीत भर घालत आहेत. त्यामुळे १९ मे पर्यंत आपले काम उरकून रस्ते व पदपथ पूर्ववत करण्याची ताकीदच महापालिकेने संबंधित कंपन्यांना दिली आहे.