शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 3 क्रमांक

By admin | Updated: January 28, 2017 10:56 IST

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 28 - दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला असून त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. 
 
देशाच्या स्वांतत्र्य लढयामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे लोकमान्य टिळकांचे व्यक्तीमत्व आणि त्यांच्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावर आधारीत देखावा महाराष्ट्राच्या चित्ररथातून मांडण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते, त्यामध्ये ' महाराष्ट्राचा चित्ररथ' अव्वल ठरला होता, तर दुस-या क्रमांकावर आहे तामिळनाडूचा चित्ररथ होता.
कसा होता महाराष्ट्राचा चित्ररथ
 
महाराष्ट्राने चित्ररथाद्वारे टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सादर करण्यात आले. लोकमान्यांच्या १६0व्या जयंती वर्षानिमित्त स्वातंत्र्य चळवळीत टिळकांचे योगदान, पारतंत्र्यात ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रांनी  चालवलेली सामाजिक जागृती, शिवजयंती व गणेशोत्सव सुरू करून महाराष्ट्रातील जनतेसह भारतीयांना सांस्कृतिक व्यासपीठांवर संघटित करण्यासाठी टिळकांनी हाती घेतलेली मोहीम, ब्रिटिश सरकारने टिळकांविरुद्ध चालवलेले खटले, शिक्षण व व्यायामाला टिळकांनी दिलेले विशेष प्रोत्साहन या बाबींचा चित्ररथात समावेश होता. 
 
चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा अग्रलेख लिहितानाचा १५ फूट उंचीचा भव्य पुतळा असून, पुतळ्यामागे टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’च्या छपाईसाठी १९१९ साली लंडनहून मागवलेल्या डबल फिल्टर प्रिंटिंग मशिनवर छपाई होत असलेले वृत्तपत्र दर्शवण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी फिरत्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज व श्रीगणेशाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. 
 
चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूला बंगालच्या फाळणीनंतर मुंबई हायकोर्टात टिळकांविरुद्ध चाललेला खटला व मंडालेच्या तुरुंगातील त्यांचा कारावास दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात व्यायामाला व शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या टिळकांच्या स्मृती जागवण्यासाठी मल्लखांब व कुस्ती खेळणारी मुले तसेच बाकावर बसलेल्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे लाइव्ह प्रदर्शन केले.
 
चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती विख्यात कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४0 कारागिरांनी हा अतिशय लक्षवेधी चित्ररथ तयार केला आहे. रायगड जिल्ह्यातील उरणच्या रूद्राक्ष ग्रुपच्या २८ कलाकारांचे पथक राजपथावर चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना ‘पहिलं नमन हो करितो वंदन, ऐका तुम्ही हो गुणीजन करितो कथन’ या गीतावर नृत्य सादर करणार आहे. मुंबईतल्या दादर येथील समर्थ व्यायाम मंदिराचे ३ क्रीडापटू चित्ररथावर मल्लखांब व कुस्तीची प्रात्यक्षिके सादर केली.