शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नारायण साटम यांना दाजी भाटवडेकर स्मृती पुरस्कार

By admin | Updated: December 22, 2014 03:32 IST

मराठी साहित्य संघ आणि डॉ. दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉ. दाजी भाटवडेकर स्मृतिदिन साजरा केला जातो.

मुंबई : मराठी साहित्य संघ आणि डॉ. दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉ. दाजी भाटवडेकर स्मृतिदिन साजरा केला जातो. यंदा साहित्य संघाने ८०व्या वर्षात पदार्पण केले असून, या अष्टदशक पर्वातील नाट्यसेवा गौरव पुरस्कारही दिले जाणार आहेत. यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी नारायण साटम हे डॉ. दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.यंदाचा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा २५ डिसेंबर रोजी साहित्य संघाच्या डॉ. भालेराव नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता पार पडेल. या सोहळ््याला संघाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहतील. मुंबई मराठी साहित्य संघ आणि महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ पुरस्कृत रंगभूषाकारासाठी कृष्णा बोरकर यांना गौरविण्यात येणार आहे. तर मुंबई मराठी साहित्य संघ आणि प्रभाकरपंत जोशी ट्रस्ट, लीला मेहता पुरस्कृत मराठी लोकनाट्य कलावंत मेघा घाडगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.मुंबई मराठी साहित्य संघ आणि श्यामा खोत पुरस्कृत डॉ. मधुकर आष्टीकर स्मृतिप्रीत्यर्थ विनोदी नाट्यलेखनासाठी लेखक विवेक बेळे यांचा गौरव करण्यात येईल. तर साहित्य संघ आणि रजनी मेहता स्मृतिप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट स्त्री-कलावंत या पुरस्काराचे मानकरी शकुंतला नरे ठरल्या आहेत. या पुरस्कार सोहळ््यानंतर मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या नाटकांतील गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात अनेक कलावंत सहभागी होतील. (प्रतिनिधी)