शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या नातलगाकडील विवाहास पोलिसांची हजेरी

By admin | Updated: May 23, 2017 03:21 IST

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेसंबंधातील शाही विवाह सोहळ्यास पोलीस अधिकाऱ्यांनीही हजेरी लावल्याचे उघडकीस आल्याने आता त्यांच्यामागे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेसंबंधातील शाही विवाह सोहळ्यास पोलीस अधिकाऱ्यांनीही हजेरी लावल्याचे उघडकीस आल्याने आता त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सोशल मिडियावर यासंदर्भात एक संदेश प्रसारीत झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.नाशकातील बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कुटुंबियाकडे नुकताच विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यास देशभरातील बुकींसह, गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्तांसह सुमारे वीसहून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हजेरी लावल्याची माहिती समाजमाध्यतून पुढे आली. त्याची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे़ या सोहळ्यास दाऊदच्या परिवारातील काही सदस्यांसह देशभरातील राजकीय व प्रतिष्ठीत व्यक्तींनीही हजेरी लावली होती. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्राथमिक स्तरावरील जबाब घेतले जात असून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे़ वरिष्ठांच्या सूचनेनुसार या अहवालानंतर संबंधितांवर कोणती कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.पोलीस अधिकाऱ्यांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे़