शहरं
Join us  
Trending Stories
1
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
2
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
3
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
4
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
5
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
6
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
7
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
8
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
9
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
10
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
11
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
12
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
13
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
14
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
15
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
16
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
18
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
19
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
20
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदचे हस्तक नगरसेवक जात्यात, परमार प्रकरणातून घेतला नाही धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 03:10 IST

बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाण्यातील चार नगरसेवकांना अटक झाली होती तर दोन बड्या नेत्यांभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले होते.

राजू ओढेठाणे : बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाण्यातील चार नगरसेवकांना अटक झाली होती तर दोन बड्या नेत्यांभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले होते. आता इक्बाल कासकरला खंडणी वसुली करण्याकरिता बिल्डरांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पुरवून तीन ते चार नगरसेवक व नेत्यांनी मदत केल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने पुन्हा नगरसेवक संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. या नव्या वादात परमार प्रकरणातील दोनजण तर अन्य एकजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माजी नगरसेवक असल्याची चर्चा ठाण्याच्या वर्तुळात सुरु झाली आहे.ठाणे हे सुशिक्षितांचे, सांस्कृतिक घडामोडींचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र असून या शहरातील नगरसेवक परमार प्रकरणापाठोपाठ थेट दाऊद टोळीला खंडणी वसुलीसाठी सहकार्य करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने ठाणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आयुक्त सिंग यांनी चौकशी सुरु असल्याने नगरसेवकांची नावे जाहीर केलेली नसली तरी लवकरात लवकर ती जाहीर करावी. सर्वच नगरसेवकांभोवती संशयाचा धुरळा उडवू नये, अशा शब्दांत काही नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. परमार प्रकरणात एक डायरी मिळाली असून त्यामध्ये ठाण्यातील काही बड्या नेत्यांना पैसे दिल्याचे दावे पोलीस व आयकर विभागाने करुन संशयाचे ढग निर्माण केले होते. प्रत्यक्षात त्यापैकी कुणावरही कारवाई झाली नाही. त्याचीच पुनरावृत्ती पोलिसांनी करु नये, असे ठाणेकर व लोकप्रतिनिधी यांचे म्हणणे आहे.खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह तिघांना सोमवारी रात्री अटक केली. या कारवाईची माहिती देताना आयुक्त सिंग यांनी ठाण्यातील तीन ते चार राजकीय नेत्यांची भूमिका खंडणी प्रकरणात संशयास्पद असल्याचा गौप्यस्फोट केला. यात नगरसेवक व त्यांच्यापेक्षा काही मोठ्या नेत्यांचा समावेश असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.राजकीय नेत्यांनी मोठे बिल्डर किंवा व्यापारी हेरून त्यांच्या व्यवसायावर नजर ठेवली. त्यांच्या व्यवसायातील त्रुटी हेरून त्यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे तक्रारी केल्या. या तक्रारींमुळे बिल्डरांचे प्रकल्प किंवा व्यापाºयांचे व्यवसाय वादाच्या भोवºयात सापडले. हे वाद त्यांनीच डी-गँगपर्यंत पोहोचवले.थोडक्यात खंडणी उकळण्यासाठी पुरेशी तयारी करून देण्याचे काम ठाण्यातील काही नेत्यांनी केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आली आहे. ठाण्यातील जैन बिल्डरने घोडबंदर रोडवर उभारलेल्या ‘रोझाबेला’ इमारतीबाबतही अशीच माहिती कासकरपर्यंत पोहोचल्यानंतर तेथील चार फ्लॅट बळकावण्यात आले. तपासामध्ये निष्पन्न झालेल्या नेत्यांवर कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.>नावे जाहीर करण्याची अन्य नगरसेवकांची मागणीपरमार प्रकरणात जेव्हा काही लोकप्रतिनिधींची नावे आली तेव्हाही पोलिसांनी ती जाहीर केली नाही. त्यात संदिग्धता राहिल्याने अनेक नगरसेवकांवर बोट दाखवण्यात आले. त्यामुळे आता नावे जाहीर करण्याची अन्य नगरसेवकांची मागणी आहे.अत्यंत गोपनीयता बाळगून व काटेकोर नियोजन करुन ठाणे पोलिसांनी दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकरच्या निवासस्थानी सोमवारी रात्री सिनेस्टाईल धडक दिली. एखाद्या चित्रपटातील दृश्याला साजेसी अशी थरारक कारवाई करुन पोलिसांनी इक्बाल कासकरला जेरबंद केले.ठाण्यातील एका बिल्डरच्या खंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचे नाव समोर आल्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांकडून कारवाईची परवानगी घेतली. त्यानंतर कासकरच्या मुसक्या आवळण्याची व्यूहरचना करण्यात आली. सुमारे ४५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, शस्त्रसज्ज कमांडो आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा मोहिमेसाठी सज्ज करण्यात आला. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कासकर हा नागपाडा येथील ‘सोफीया जुबेर रोड’वरील ‘गार्डन हॉल’ अपार्टमेंटमध्ये हसिना पारकरच्या निवासस्थानी असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. माहिती खरी असल्याची खात्री पटल्यानंतर इमारतीपासून काही अंतरावर पोलिसांचा ताफा जमला. अपार्टमेंटमध्ये गेटजवळच सुरक्षा रक्षकांचीकेबीन आहे.अपार्टमेंटमध्ये बाहेरून येणाºया प्रत्येक व्यक्तीचे रहिवाशासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे करून दिले जाते. रहिवाशाने होकार दिला तरच अभ्यागताला इमारतीमध्ये प्रवेश दिला जातो. इमारतीजवळ पोहोचताच पोलिसांनी प्रथम सुरक्षा रक्षकांना हटविले. इमारतीतून बाहेर पडण्याच्या मार्गांवर तसेच टेरेसवरही पोलीस कर्मचारी तैनात केले. त्यानंतर लगेचच शर्मा यांनी काही कमांडोंना घेऊन पारकरच्या फ्लॅटवर धडक देऊन कासकर आणि अन्य दोघांच्या मुसक्या आवळल्या.मोहीम निर्विघ्नपणे फत्ते झाली. मात्र पोलिसांची यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज होती. कासकर किंवा त्याच्या हस्तकांनी प्रतिकार केला असता तर वेळप्रसंगी गोळीबार करण्याची तयारी पोलिसांनी केली होती. तशी पूर्वकल्पना उच्चपदस्थ पोलीस अधिकाºयांना देण्यात आली होती.>कासकरच्या अटकेसाठी स्थापन केली होती चार पथकेकासकरच्या अटकेसाठी आखलेल्या मोहिमेवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी बारकाईने लक्ष ठेवले. सहायक आयुक्त एन.टी. कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या नेतृत्वात यासाठी चार पथके गठीत करण्यात आली होती. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक व्ही.आर. महाजन, आर.जे. देवरे, प्रशांत भुर्के, सुरेश कदम, बाबा मुल्ला, डी.आर. कटकधोंड, एस.आर. मोरे, एस.आर. यादव, बी.एस. गोसावी, सी.बी. ठाकरे, शरद तावडे, गोविंद सावंत, गणेश वाघमोडे, संदीप शिर्के, अविनाश कदम, शरद आव्हाड आदींचा समावेश होता.>मादक पदार्थांची तस्करीखंडणी उकळण्यासोबतच कासकर मादक पदार्थांच्या तस्करीतही गुंतला असल्याचा पोलिसांना संशय आहे. कासकरसोबत अटक केलेल्या दोघांपैकी एक आरोपी मादक पदार्थांच्या तस्करीत गुंतला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आरोपीचे आणि कासकरचे संबंध तपासले जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.>दाऊदचासहभाग तपासणारखंडणी प्रकरणात दाऊद इब्राहिमचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे का, यादृष्टीनेही तपास सुरु असल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तक्रारदारास काही आंतरराष्ट्रीय कॉल्स आले आहेत. याशिवाय आरोपींनी खंडणी मागताना दाऊदच्या नावाचा वापर केला आहे. या प्रकरणात दाऊदचा सहभाग आढळल्यास त्याच्याविरूद्धही गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस आयुक्त म्हणाले.>मोक्का लावणारखंडणी, परराज्यातील शुटर्सच्या मदतीने धमक्या देणे, भूखंड बळकावणे असे गुन्हे कासकरने ठाणे, मुंबई, नवी मुंबईत केले आहेत. त्याला यापूर्वीही अटक झाली होती. मात्र तो जामिनावर सुटला. ठाण्यातील आणखी एक बिल्डर आणि सोने व्यावसायिकाकडून त्याने खंडणी उकळल्याची माहिती आहे. वाशीतील एका बिल्डरने त्याच्या धमक्यांना घाबरून शहरच सोडले.>डाग पुसलाशंभरपेक्षा जास्त गुंडांचा चकमकीत खातमा करणाºया एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचे आरोप अनेकदा झाले. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाची धुरा त्यांनी मागील महिन्यात स्वीकारली. अल्पावधीत थेट दाऊदच्या भावाला बेड्या ठोकून शर्मा यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सिद्ध केल्याचा दावा शर्मा यांच्या निकटवर्तीयांनी केला.>कासकर पाहतहोता केबीसीपोलिसांनी पारकरच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा कासकर बिर्याणीवर ताव मारत टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम पाहण्यात दंग होता. पोलिसांच्या कारवाईची त्याला तिळमात्र कल्पना नव्हती. त्याची गाफिली पोलिसांच्या पथ्यावर पडली.