शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील अंधार मिटणार, सरकार वीज नाही कापणार, दीपक केसरकर यांची विधानसभेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 06:32 IST

मुंबई : बिल भरले नाही म्हणून जिल्हा परिषदांसह कोणत्याही शासकीय शाळेतील वीज कापली जाणार नाही आणि या बिलापोटीची रक्कम ...

मुंबई : बिल भरले नाही म्हणून जिल्हा परिषदांसह कोणत्याही शासकीय शाळेतील वीज कापली जाणार नाही आणि या बिलापोटीची रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांऐवजी यापुढे राज्य सरकार भरेल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. 

सुनील राणे, संजय सावकारे, अशोक चव्हाण, ॲड. आशिष शेलार, दिलीप वळसे- पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील वीजपुरवठा याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. यावेळी सरकारी शाळांची वीज कापू नका, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. 

त्यावर केसरकर यांनी सांगितले, की  या शाळांना पूर्वी व्यावसायिक वीजदर लावला जात होता; पण आमच्या सरकारने घरगुती वापराच्या विजेचे दर लावण्याचा निर्णय घेतला आहे. वीज मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी मी बोललो. वीज बिल भरले नाही म्हणून कोणत्याही शासकीय शाळेची वीज कापू नका, असे त्यांना सांगितले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. सध्या सर्व शासकीय शाळांमधील जानेवारी २०२३ पर्यंतची वीज देयके अदा करण्यात आली आहेत.

कायमस्वरूपी तोडगाप्राथमिक शाळांसह सार्वजनिक बाबींचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. आगामी  काळात सौर ऊर्जेवर शाळा सुरू करण्यावर शासनामार्फत भर देण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर