शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

डेंग्यूची साथ खरी की खोटी?

By admin | Updated: September 25, 2016 01:43 IST

गेल्या काही वर्षांत राज्यभरात पावसाला सुरुवात झाल्यावर ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरिस या आजारांच्या साथींच्या बातम्या मोठ्या प्रमाणात यायला लागतात.

- पूजा दामलेगेल्या काही वर्षांत राज्यभरात पावसाला सुरुवात झाल्यावर ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरिस या आजारांच्या साथींच्या बातम्या मोठ्या प्रमाणात यायला लागतात. पावसाळ््यात पसरणाऱ्या या साथींमुळे काहींचे बळी जातात. सध्या राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट्स कमी होऊन जिवाला धोका निर्माण होतो. डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट्स चढवण्यात येतात. परिणामी, प्लेटलेट्सची मागणी वाढते आणि किमतीही. यात भरडला जातो तो सामान्य माणूस, पण अधिकृत प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्टकडून रक्त तपासणी करून घेतल्यास होणारी फसवणूक नक्कीच थांबू शकते आणि ‘डेंग्यूचा ताप’ ही उतरू शकतो. पावसाला सुरुवात झाल्यावर सार्वजनिक आणि घराच्या परिसरात पाणी साचून राहते. अनेकदा साठलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते, पण या साचलेल्या पाण्यातच डेंग्यूच्या डासांची म्हणजे एडिस इजिप्ती डासांची पैदास होते. एका ठिकाणी सात दिवस पाणी साचून राहिल्यास तिथे या डासांची पैदास होते. एडिस इजिप्ती डास चावल्याने डेंग्यूचा ताप येतो. ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी येणे ही सामान्य तापाची लक्षणेच डेंग्यू आणि मलेरियाच्या तापातदेखील असतात. त्यामुळे ताप आल्यावर व्हायरल फिवर, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरसिस, टायफॉईड यापैकी कोणताही ताप असू शकतो. ताप नक्की कसला आहे, याचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते, पण अनेकदा योग्य पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने रक्त तपासणी न झाल्यास योग्य निदान होत नाही. त्यामुळे साथीच्या आजारांची गंभीर परिस्थिती निर्माण होते.ताप आल्यावर डॉक्टर कम्पिल्ट ब्लड काउंट (सीबीसी)ची तपासणी करण्यास सांगतात. त्याबरोबरीने डेंग्यू आणि मलेरियाची तपासणी करण्याचा सल्लाही दिला जातो. पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रशिक्षित एमडी अथवा तत्सम शिक्षण घेतलेला पॅथॉलॉजिस्ट असल्यास सीबीसी तपासणीत फक्त ब्लड काउंट अहवाल म्हणून देत नाही, तर रक्ताचा नमुना स्लाइडवर पाहतो. रक्ताचा नमुना स्लाइडवर पाहिल्याने मार्फालॉजीचा अभ्यास करतो. या मार्फालॉजीवरून रक्तात किती प्लेटलेट्स आहेत, किती दिवसांनी प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका आहे, याची सविस्तर कल्पना येते. हा अहवाल पॅथॉलॉजिस्ट देतो, पण राज्यात अनेक पॅथॉलॉजी लॅबमध्ये एमडी अथवा तत्सम शिक्षण घेतलेले पॅथॉलॉजिस्ट नसल्याने, फक्त ब्लड काउंट दिला जातो. त्यामुळेच साथींच्या आजारांची साथ मोठ्या प्रमाणात पसरते. काही रुग्णांना व्हायरल फिवर असतो. व्हायरल फिवरमध्ये शरीरात बदल होतात. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे, काही वेळा प्लेटलेट्सचा एक गठ्ठा तयार होता. त्यामुळे सीबीसीमध्ये प्लेटलेट्सचा काउंट हा १० ते १५ हजार असल्याचे दाखविले जाते. प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या शरीरात प्लेटलेट्स १ लाख ४० हजार किंवा दीड लाख म्हणजे योग्य प्रमाणात असतात, पण काउंट कमी येत असल्याने, त्या व्यक्तींना प्लेटलेट्स चढवल्या जातात, पण प्लेटलेट्स वाढत नाहीत. त्या व्यक्तीच्या शरीरात योग्य प्रमाणात प्लेटलेट्स असूनही अधिक प्लेटलेट्स दिल्याने त्याच्या शरीराचे अधिक नुकसान होत नाही, पण त्या व्यक्तीला सुमारे सहा व्यक्तींच्या प्लेटलेट्स दिल्या जातात. म्हणजे त्याला रक्तसंक्रमणातून होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो, हे अत्यंत चुकीचे आहे. अनेकदा नर्सिंग होम अथवा लहान रुग्णालयाच्या इन हाउस पॅथॉलॉजी लॅब असतात. या लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नसतात. त्यामुळे रुग्णाला दाखल करून देण्यासाठी खोटा अहवाल दिला जातो. राज्यात असणाऱ्या बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबमुळेही अनेकदा खोटे अहवाल जाणूनबुजून दिले जातात. त्याचबरोबर, या बोगस पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्यांना वैद्यकशास्त्र आणि शरीरशास्त्राचे ज्ञान नसते. त्यामुळे मशिनवर आलेले रीडिंग छापून दिले जाते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईडसारख्या आजारांचा आकडा वाढलेला दिसतो, तर काही वेळा डेंग्यू, मलेरियाची साथ पसरल्याचे भीषण चित्र उभे राहते. त्यामुळे या सगळ््यातून रुग्णांचा खरा आकडा कधीच समोर येत नाही, तर दुसरीकडे अनेक रुग्णांना चुकीचे उपचार मिळतात, हे स्पष्ट झाले आहे.रुग्णांनी सतर्क राहावे!ताप आल्यावर अनेकदा रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक घाबरून जातात. तत्काळ रक्त तपासणी केली जाते, पण ही रक्त तपासणी कोणत्या पॅथॉलॉजी लॅबमधून करत आहोत, याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेही फसवणूक होण्याचा धोका वाढतो. प्रशिक्षित अधिकृत पॅथॉलॉजिस्टकडून तपासण्या करून घेतल्यास रक्त तपासणी अहवाल योग्य आणि अचूक मिळतील. त्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होण्यास मदत होईल. सरकारने ही साथींचे आजार वाढत आहेत, त्यावर उपाय म्हणून बोगस पॅथॉलॉजी लॅबना बंद करणे हा विचार पक्का केल्यास नक्कीच साथीच्या आजारांना काही आळा घालण्यास नक्कीच मदत होईल. - डॉ. संदीप यादव, अध्यक्ष,महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट