पुणे : जिल्ह्यात पाण्यांची टंचाई असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक केली जाते. या पाण्यात ‘डेंगी’च्या अळ््या आढळल्याने ७० रुग्ण संशयित आढळले असून, त्यामध्ये २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती जिल्हा आरोग्यधिकारी भगवान पवार यांनी आज पत्रकारांना दिली.खेड तालुक्यातील चाकणमध्ये ४, आंबोली ३, नीरा ४, बेलसर ४, नेरे १, कान्हूर १, फुरसुंगी १, इंदापूर १, कळस १ असे जिल्ह्यात २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर दिवसेंदिवस गडदच होत चालले आहे. पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई आहे. काही ठिकाणाी तर ८ - ८ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक केली जाते. त्यामुळे ‘डेंगी’चे डास वाढत असल्याचे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)
‘डेंगी’चे २२ रुग्ण
By admin | Updated: May 17, 2016 01:58 IST