शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

By admin | Updated: July 31, 2016 04:54 IST

मुसळधार पावसामुळे मोडकळीस आलेल्या इमारती अधिकच धोकादायक ठरू लागल्या आहेत.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मोडकळीस आलेल्या इमारती अधिकच धोकादायक ठरू लागल्या आहेत. गिरगाव येथील पहिल्या भटवाडीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे छप्पर बाजूच्या इमारतीवर शनिवारी सकाळी कोसळले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली. गिरगाव येथील पहिल्या भटवाडीत आर्यन शाळेच्या बाजूला पाठारे हाऊस ही तीन मजली इमारत आहे. तळमजला व पहिल्या मजल्याचा व्यावसायिक वापर होत असून एक कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहत आहे. हा तिसरा मजला धोकादायक असल्याने म्हाडाने संबंधितांना सन २००० मध्ये नोटीस बजावली होती. मात्र वारंवार नोटीस मिळूनही घरमालकाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास या इमारतीचे छप्पर शेजारील इमारतीवर कोसळले.पाठारे हाऊसला खेटून उभ्या असलेल्या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील घर यामुळे कोसळले. या दुर्घटनेचा अंदाज येताच पाठारे हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी तत्काळ इमारतीबाहेर पडले. मात्र बेसावध क्षणी घडलेल्या या घटनेमुळे शेजारच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील नाईक कुटुंब घाबरले. बाहेर पडता न आल्याने ते या धोकादायक निवासातच अडकून राहिले. याची खबर मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब व दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. >...आणि नाईक कुटुंब बचावलेआपल्यावर एवढे मोठे संकट ओढावणार असून आपल्या जिवावर बेतू शकते, याची किंचितही खबर नसलेल्या नाईक कुटुंबीयांचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू झाला. मात्र अचानक शेजारील इमारतीचे छप्पर त्यांच्या घरावर कोसळल्याने ते बिथरले. क्षणभर काय घडले हे त्यांना कळलेच नाही. आपल्या कुटुंबाचे व आपले प्राण वाचविणे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. तेवढ्यात अग्निशमन दलाचा मदतीचा हात त्यांच्यासाठी पुढे आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीचा ढिगारा बाजूला करून तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नाईक दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बाहेर काढले.>कुठे जाणार माहीत नाही?गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही भन्साली यांना दुरुस्ती करून घ्या, असे सांगत होतो. पण, त्यांनी दुर्लक्ष केले. म्हाडाच्या नोटीस येऊनही दुरुस्ती करून घेतली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते स्वत:च घराच्या काही भागाची दुरुस्ती करून घेत होते. अनेकदा त्यांच्या टाक्यांचे नळ सुरू राहिल्याने आमच्या घरात, गच्चीवर पाणी यायचे. याविषयी तक्रार केली होती. शेवटी आज हा प्रकार घडला. आता आम्ही कुठे जाणार माहीत नाही. मी, माझे पती आणि मुलगी घरात होतो. मी सकाळची आवराआवर करत होते. माझे पती टीव्ही पाहत होते. मुलगी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली आणि मोठा आवाज झाला. बाजूच्या इमारतीचा भाग आमच्या घरावर कोसळला आम्ही कसेबसे गॅलरीत आल्यामुळे वाचलो. बाजूच्यांना आधीच कल्पना आली होती. कारण, त्यांच्या घरात माती पडायला लागली असल्यामुळे ते खाली गेले होते. आम्ही मात्र अडकलो. - विद्या नाईक (रहिवासी)>भय इथले संपत नाही...शहर भागातील अनेक जुन्या इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. तरीही डोक्यावरचं छप्पर जाण्याच्या भीतीने शेकडो रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन जगत असतात. पाठारे हाऊसचे छप्पर कोसळल्याच्या आवाजाने अशीच धडकी आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना भरली. हे संकट आपल्यावर नाही तर बाजूच्या इमारतीवर कोसळले असल्याचे दिसून येताच माटलावाला इमारत व आसपासच्या इमारतींतील रहिवाशांचा जीव भांड्यात पडला. मात्र अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते, या भयाने ते धास्तावले आहेत.पहिल्या भटवाडीतील पाठारे हाऊसचा छपराचा भाग कोसळल्याने या ठिकाणी एकच घबराट पसरली होती. पावणेनऊच्या सुमारास घरात काम करत असताना मोठा आवाज झाला. त्या वेळी धस्सच झाले. बाजूच्या माटलावाला इमारतीचा मोठा भाग सीताराम निवासवर कोसळल्याचे वाटले. घाईत बाहेर आल्यावर समोर धुरासारखे वाटत होते, असे प्रत्यक्षदर्शी वीणा साव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाठारे निवासच्या बाजूच्या तीन इमारती सोडून चार मजली माटलावाला निवास ही इमारत आहे. त्याच्या तळ मजल्यावर आणि चौथ्या मजल्यावर असे दोनच भाडेकरू राहतात. बाकी सर्वांनी ही इमारत सोडली आहे. ही इमारत खासगी असल्याने म्हाडा या इमारतीची दुरुस्ती करू शकत नाही. पण स्वत: मालकही या इमारतीची दुरुस्ती करत नाही. माटलावाला इमारतीच्या दोन्ही बाजूला खेटून इमारती आहेत. या दोन्ही इमारतींवर मध्येमध्ये माटलावाला इमारतीची काही ढेपळं पडत असतात, असे साव यांनी सांगितले. >संकटाची नांदीमाटलावाला निवासाच्या चौथ्या मजल्यावरील इमारतीच्या वरच्या भागाला तडे गेले आहेत. त्याचा काही भाग हा आमच्या घराच्या गॅलरीत पडतो. पण मालक काहीच करत नाही. आज आमच्या बाजूच्या इमारतीचा काही भाग कोसळला. उद्या हीच परिस्थिती आमच्यावर ओढवू शकते. आम्ही जीव मुठीत घेऊन जगतो, असे जयश्री वासुदेव यांनी सांगितले.