शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा

By admin | Updated: November 9, 2014 00:51 IST

मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो.

बचावाकरिता नियमांचे पालन आवश्यक : रेडिएशन ठरू शकतात प्राणघातकनागपूर : मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. इतकेच नाही तर एका प्रयोगानुसार गरोदरपणाच्या काळात मोबाईलच्या वापरामुळे त्याच्यातून निघणारी किरणे होणाऱ्या बालकांवर नकारात्मक प्रभाव टाकतात. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या किरणांचा मोठा प्रभाव हृदयावरही पडतो. माणूस हा विद्युत संवेदनशील म्हणजे इलेक्ट्रिकली सेन्सेटिव्ह असतो. जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मोबाईलमधून येतात, तेव्हा ते हृदयाला प्रभावित करतात. याच्या अधिक वापरामुळे इतर काही लक्षणेही दिसतात. यामध्ये डोक्याच्या त्वचेमध्ये जळजळ होणे, थकवा येणे, झोप न येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थपणा, हृदयाचे ठोके वाढणे इतकेच नाही तर पचनक्रियेवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. युरोपीय रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधनानुसार मोबाईलमधून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे किडनी स्टोन किंवा आरोग्यासंबंधी अन्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या वापरामुळे कर्करोग झाला असे सांगण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा नसतो. कारण मोबाईल वापरण्याआधीची आकडेवारी, मोबाईल वापरल्यानंतरची आकडेवारी, तसेच मोबाईल किती प्रमाणात वापरला याची आकडेवारी आणि त्यातून सांख्यिकीदृष्ट्या काढलेला निष्कर्ष ही सगळी प्रक्रिया किचकट आहे. म्हणूनच याबाबतचे ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत, पण तरीही आपल्याला अनेक वर्षांपासून किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम माहीत असल्याने आपण त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करू शकतो. भारतात जवळपास ९० कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करतात. रस्ता ओलांडताना, गाडी चालवताना, इतकेच नाही तर रेल्वे रुळ ओलांडतानादेखील माणसे मोबाईलवर बोलत असतात. त्यातूनच अपघाताच्या अनेक घटना घडतात, पण तरीही आपण जागृत होत नाही. ‘प्राण जाये पण मोबाईल न जाये’ अशी स्थिती आपल्याकडे आलेली दिसते, पण ही परिस्थिती खूप घातक आहे.दुष्परिणामांपासून बचावाचे उपायमोबाईलच्या दुष्परिणामांपासून बचावासाठी मोबाईल साक्षरता आणि परिपक्वता आवश्यक आहे. शक्यतो मोबाईलवर बोलताना कामापुरतेच बोलावे. तासन्तास गप्पा मारत बसू नये.शक्य असेल तिथे लँडलाईन फोनचा उपयोग करावा.एसएमएसद्वारेदेखील निरोप पोहचवता येऊ शकतात. मोबाईल टॉवर बसविण्यासंदर्भातील नियमावलीशैक्षणिक संस्था व इस्पितळांच्या परिसरात मोबाईलचे टॉवर बसवू नयेत. त्यामुळे मुलांना व आजारी व्यक्तींना कमी प्रतिकारशक्तीमुळे किरणोत्सर्गाचा त्रास संभवतो.चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये मोबाईल टॉवर्स बसवू नयेत. कारण वादळ व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत ते अधिक धोक्याचे ठरू शकतात.मोबाईल टॉवर बसविताना तो कमीत कमी तीन मीटर दूर असला पाहिजे व अँटिना इमारतीच्या दिशेने ठेवू नये.बेस स्टेशन अँटिना जमिनीपासून तसेच छतापासून तीन मीटर उंचीवर बसवावा.लोकांना अशा टॉवरजवळ जाता येऊ नये म्हणून टॉवरच्या भोवताली संरक्षक भिंत व तारा लावाव्यात.टॉवरजवळ धोक्याची सूचना असलेला मोठा फलक लावणे, तसेच त्या भागात धोक्याचा इशारा असलेली सूचना लावणे कंपनीवर बंधनकारक आहे.मोबाईल टॉवरसंबंधी कामे करणाऱ्या कामगार व तंत्रज्ञांना विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गापासून संरक्षण देणे आवश्यक आहे.