शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हातगाडी पुरविणाऱ्या दलालांना दणका

By admin | Updated: July 12, 2017 02:45 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या वर्षानुवर्षे भाड्याने दिल्या जात होत्या.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या वर्षानुवर्षे भाड्याने दिल्या जात होत्या. दलाल प्रत्येक गाडीसाठी प्रतिदिन ३०० रुपये भाडे आकारत होते. या अवैध व्यवसायाविरोधात सुरक्षा विभागाने जोरदार मोहीम राबविली आहे. २० हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या दलालांनी मार्केटबाहेर काढल्या आहेत. यामुळे वाहतूककोंडी काही प्रमाणात सुटली असून, व्यापाऱ्यांसह वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. मुख्य प्रशासक सतीश सोनी, सचिव शिवाजी पहिनकर यांनी चुकीचे कामकाज होत असल्याचे निदर्शनास आणल्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फळ मार्केटमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. वाहतूककोंडीची कारणे शोधून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. उपसचिव सीताराम कावरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी संजय तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वेक्षण सुरू केले असताना, मार्केटमध्ये हातगाड्यांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले. याविषयी उपसचिवांनी ग्रोसरी बोर्डाचे अधिकारी व इतर घटकांशी चर्चा केली असता, मार्केटमध्ये फक्त ५६ हातगाड्यांना परवानगी देण्यात आल्याचे निदर्शनास आले. उर्वरित सर्व अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या होत्या. यामध्ये डब्ल्यू हा शब्द लिहिलेल्या ५०पेक्षा जास्त हातगाड्या होत्या. या गाड्यांचा मालक कुर्ला येथे वास्तव्य करत आहे. मार्केटमधील परप्रांतीय कामगारांना ३०० रुपये प्रतिदिन या दराने तो हातगाडी भाड्याने देत होता. अशाच प्रकारे इतर काही दलाल गाड्या भाड्याने देत होते. रोज जवळपास ५० हजार रुपये भाडे वसूल केले जात होते. हातगाडीचालक काम झाले की, मार्केटमध्ये जागा मिळेल तेथे गाड्या उभ्या करत होते व त्यांना साखळी व कुलुप लावले जात होते. यामुळे रहदारीसही अडथळा निर्माण होऊ लागला होता. दोन दिवसांपासून या हातगाड्यांविरोधात जोरदार मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोखंडी गजाने कुलुप तोडून हातगाड्या ताब्यात घेऊन नवीन मार्केटच्या परिसरात नेऊन ठेवल्या आहेत. काही हातगाडीमालकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षा अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याने त्यांनी तत्काळ अनधिकृत हातगाड्या मार्केटच्या बाहेर काढून ट्रकमध्ये घालून तेथून घेऊन गेले. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे अवैध व्यवसाय करून पैसे कमविणाऱ्यांचा धंदा बंद झाला आहे.सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवालफळ मार्केटमध्ये सुरक्षा विभागाने २० हातगाड्या जप्त केल्या आहेत. कारवाईच्या भीतीने उर्वरित हातगाड्या दलालांनी मार्केटबाहेर नेल्या आहेत. संजय तळेकर व त्यांच्या सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याविषयी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तयार करून, सुरक्षा अधिकारी सी. टी. पवार यांच्यामार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.सर्व मार्केटमध्ये तपासणी व्हावीफळ मार्केटमधील अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच धर्तीवर कांदा-बटाटा मार्केट, मसाला, धान्य व भाजी मार्केटमध्ये किती हातगाड्या अधिकृत आहेत व किती अनधिकृत आहेत, याविषयी सर्वेक्षण करण्यात यावे व अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. अनधिकृतपणे हातगाडी भाड्याने देणाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.