शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

नृत्यातला गणराय

By admin | Updated: September 4, 2016 02:17 IST

सिंधुर वदन मदन सम सुंदर । लंब उदर शशी पाशांकित कर गुरू पंडिता रोहिणी भाटे यांची साहित्य, संगीत आणि नृत्यरचना असलेली

- शर्वरी जमेनीससिंधुर वदन मदन सम सुंदर । लंब उदर शशी पाशांकित करगुरू पंडिता रोहिणी भाटे यांची साहित्य, संगीत आणि नृत्यरचना असलेली ही वंदना साकारताना एक वेगळीच अनुभूती मिळाली. शास्त्रीय नृत्य आणि ‘गणेश’ हे दैवत यांचे खूप जवळचे नाते. गणेशाला सर्व कलांचा अधिपतीच म्हटलय. लंबोदर, एकदंताय, गजवदन, शूर्पकर्ण हे त्याचे प्रत्येक विशेषण नृत्यातून सौंदर्यपूर्णरीत्या साकारता येते. प्रत्येक नृत्य शैलीप्रमाणे ते वेगवेगळे दिसते, पण तरीही खुलूनच येते. असंख्य स्तोत्र, असंख्य वंदना, असंख्य कवित्व या गणेशावर वेगवेगळ्या तालात रचली जातात आणि त्यावर नृत्याचा साज चढतो. अतिशय आगळे वेगळे, तरीही अत्यंत विलोभनीय, मोहक असे हे गणेशाचे रूप आहे, म्हणूनच रोहिणीताई त्याला मदनाची उपमा देतात, मदनाप्रमाणे सुंदर म्हणतात. जेव्हा-जेव्हा गणेशावर नृत्य होते, तेव्हा-तेव्हा आवर्जून माझ्या गुरूंचे स्मरण होतेच होते. कारण गणेश हे त्यांचे अत्यंत लाडके दैवत होते. घरामध्ये तांदळावर कोरीव काम केलेल्या गणेशापासून ते अत्यंत जड अशा पंचधातूच्या मोठ्या गजाननापर्यंत अनेक मूर्ती, प्रतिमा त्यांनी संग्रहित केलेल्या होत्या. त्यांच्या घरी गेलो की, त्या बघताना मन प्रसन्न तर होऊन जायचेच, पण रोहिणीतार्इंच्या म्हणण्याप्रमाणे ‘ऊर्जा’ही मिळायची. रोहिणीतार्इंनी ७ १/२ मात्रांच्या ह्यनीलह्ण तालात बांधलेले गणेशवर्णनपर धृपद मला शिकायला मिळाले, याबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजते.गणनाथ गौरी सुत, जगत की सुख देत ।लंबोदर, शुंडधर ग्यान ध्यान सकल सिद्धी देत।।मती अमीत गती ललित नृत्य गान करत मुरत भजत।गणानाथ गौरी सुत.... जगत को सुख देत ।।खरोखरच विघ्नहर्ता गजाननावर प्रत्येक कलावंतांची श्रद्धा आहे. नृत्याच्या प्रस्तुतीकरणाचा प्रारंभ हा मी जेव्हा-जेव्हा गणेशवंदनेनी करते, मन तेव्हा प्रसन्न होते, एकाग्र होते आणि ऊर्जाही मिळते.सर्व विघ्नहर तस्मै गणाधिपतये नम:। सर्व विघ्नांचे हरण करणारा सर्व गणांचा अधिपती, गणनायक त्याला माझा नमस्कार! संत रामदासांनी रचलेली गणेशाची आरती गुरू रोहिणीतार्इंनी नृत्यातून साकारली, तेव्हा पुन्हा नव्याने वेगळ्या रूपात गणेशाचे दर्शन घडले. ॐ नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फलदायका।सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव।।नृत्य करता सकळ देव तटस्थ होती ॐ।प्रत्येक देवाचे काहीतरी वैशिष्ट्य असते. नृत्यातून वंदना करताना जरी भक्तिरस असला, तरी त्या देवतेची ती वैशिष्ट्ये प्रकट होत असतात. उदाहरणार्थ, शंकराच्या वंदनेत आक्रमकता, रूद्र भाव येऊन जातात, तर श्रीकृष्णाच्या वंदनेमध्ये नटखट भाव, पण गणेशाच्या वंदनेत शांतता, प्रसन्नता आणि मंगलमयता अनुभवायला मिळते. नृत्य करणाऱ्यालाही आणि पाहणाऱ्यालाही! त्याला सर्वांगसुुंदर म्हटलेय. सर्व अंगांनी सुंदर, बुद्धिदाता, कलानिपुण ही प्रत्येक विशेषण नृत्यातून साकारता येतात. शिवाय त्याची जन्मकथा, गजवदन त्याची आई-वडिलांच्या भोवतीची बुद्धीची साक्ष पटविणारी प्रदक्षिणा अशा अनेक पौराणिक कथा-नृत्यातून दृश्य रूपात रसिकांपर्यंत समर्पकरीत्या सादर केल्या जातात. कुठलाही मोठा सत्कार समारंभ किंवा सध्याच्या काळातले इव्हेंट असोत, नंतर सगळा भरणा लावणी, आयटम सॉंग, चित्रपट गीते, नृत्याचा असला, तरी सुरुवात ही गणेशवंदनेनीच होते. कोकणातील पारंपरिक दशावतार खेळीत, तर गण गणपतीला वेगळेच स्थान आहे. संगीतनाटकाच्या सुरुवातीलादेखील गणेश नांदी गायली जाते. गणेशाचा मुखवटा चढवून कलावंत पारंपरिक पद्धतीने पदलालित्य करत, एक हात आशीर्वादाचा आणि एका हातात मोदक दाखवित. ‘गणपती आला नी नाचून गेला’ म्हणून नृत्य करतो आणि संपूर्ण सभागृहाचे वातावरण भावपूर्ण होऊन जाते. सामान्यांनाही अतिशय आपलासा वाटणारा, सखा वाटणारा गजानन नृत्यातून साकारताना मला नेहमीच विशेष आनंद होतो आणि माझ्याकडून अचानक कवित्व स्पुरते-सिंदूर चर्चित, एकदंत चर्तुभुज अष्टसिद्ध, कलानिपुण, दाता करे भयको दूर।अतिसुंदर लयगती गणाधीश गणपती।।जय जय श्री जय जय श्री जय जय श्री।(सप्टेंबर महिन्याच्या मानकरी असलेल्या लेखिका प्रसिद्ध नृत्यांगना आहेत.)