शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील डान्सबारना हिरवा कंदील; सुप्रीम कोर्टाने रद्द केल्या कठोर अटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 05:29 IST

मद्यविक्रीसही परवानगी : सीसीटीव्हीची सक्ती नाही, पैसे उधळण्यास मज्जाव

मुंबई : डान्सबारबंदीसाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी तिसऱ्यांदा केलेल्या कायद्यातील अनेक जाचक व कठोर अटी रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या कायद्यावर वैधतेची मोहर उमटविली. यामुळे गेली १३ वर्षे बंद पडलेले मुंबई परिसरातील डान्सबार पुन्हा सुरू होतील.

या निकालामुळे मद्य पीत बारबालांची नृत्ये पाहता येतील. मात्र बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत. डान्सबारमधील नृत्ये उन्मादक असणार नाहीत यावर नजर ठेवण्याचा पोलिसांचा अधिकार अबाधित आहे.

डान्सबारमध्ये पैसे उधळण्याने कुटुंबे उद््ध्वस्त होऊ नयेत व बारबालांचे शोषण होऊ नये यासाठी त्यावर बंदी न घालता बंधने घालणारा कायदा विधिमंडळाने २०१६ मध्ये मंजूर केला. त्यास आव्हान देणाºया याचिका ‘इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन’ व ‘ बारगर्ल्स युनियन’नी केल्या. ज्यांनी डान्सबारवर बंदीचा पहिला कायदा २००४ मध्ये केला, ते दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने स्थापलेल्या फाउंडेशनने कायदा टिकावा यासाठी याचिका केली होती. त्यावरील निकाल न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने जाहीर केला.या अटी झाल्या रद्द

  • च्मद्यविक्रीस पूर्ण प्रतिबंध.
  • च्प्रवेशद्वार व आत सीसीटीव्ही. रेकॉर्डिंग
  • ३० दिवस ठेवणे.
  • च्उपाहारगृह-डान्सबारमध्ये पार्टिशन टाकून दोन्ही भाग वेगळे ठेवणे.
  • च्डान्सबारला डिस्कोचावा आॅर्केस्ट्राचा परवाना न देणे किंवा ज्या ठिकाणी आधीपासूनच परवाना आहे तेथे डान्सबारचा परवाना न देणे.
  • च्डान्सबार शैक्षणिक संस्था वा धार्मिक स्थळापासून एक किमी लांब असणे.
  • च्मालकाने बारबालांना लेखी कराराने मासिक पगारी तत्त्वावरच नोकरीवर ठेवणे, पगार बँकेत जमा करणे.
  • च्ग्राहकांना बारबालांना जी बक्षिशी द्यायची असेल ती बिलामध्ये घेणे, नंतर ती बारबालांना वाटणे.
  • च्परवाना मागणाºयाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेलेच कर्मचारी नोकरीस ठेवणे.

 

व्यवहार्य नियमांचे पालन करण्यास बारमालक व कर्मचारी तयार आहेत. नियमांची पायमल्ली करणाºयांवर सरकारने खुशाल कारवाई करावी.- प्रवीण अगरवाल,उपाध्यक्ष-फाइट फॉर राइट बार ओनर्स असोसिएशन 

नियमावलीमुळे बारगर्लचे शोषण कमी होऊन, त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळण्याची शक्यता अधिक आहे.- प्रभा देसाई, अध्यक्षा-सन्मित्र ट्रस्ट

टॅग्स :danceनृत्यSupreme Courtसर्वोच्च न्यायालय