शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बंद टोल नाक्यांच्या हिशेबात बांधकाम खात्याची दमछाक

By admin | Updated: August 26, 2014 00:57 IST

शासनाने घाईगडबडीत राज्यातील ४४ टोल नाके बंद केले असले तरी या टोल नाक्यांच्या परताव्याचा हिशेब जुळविताना आता बांधकाम अभियंत्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांचीच दमछाक होत आहे.

न्यायालयात पुन्हा वेळ मागितला : नुकसानभरपाई प्रस्तावाला अर्थखात्याची मंजुरीच नाही यवतमाळ : शासनाने घाईगडबडीत राज्यातील ४४ टोल नाके बंद केले असले तरी या टोल नाक्यांच्या परताव्याचा हिशेब जुळविताना आता बांधकाम अभियंत्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांचीच दमछाक होत आहे. दरम्यान या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी शासनाने मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा दोन आठवड्यांची मुदत वाढवून घेतली आहे.विरोधी पक्षाचा जोर आणि जनतेचा दबाव यामुळे राज्य शासनाने ४४ टोल नाके मुदतीपूर्वीच बंद केले. त्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ११ टोल नाक्यांचा समावेश आहे. उर्वरित टोल नाके खासगी कंपन्यांचे आहे. मुदतीपूर्वी टोल नाके बंद केले म्हणून बीओटी उद्योजकांनी शासनाला दोन हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई अर्थात परतावा मागितला आहे. तर रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिगीकर यांनी आपल्या दहा टोल नाक्यांपोटी एक हजार ८२५ कोटी रुपयांच्या परताव्याचा हिशेब शासनाला सादर केला आहे. दुसरीकडे परतावा मिळविण्यासाठी बीओटी उद्योजकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने शासनाला आपली बाजू मांडण्यासाठी आतापर्यंत सलग पाच तारखा दिल्या आहेत. २२ आॅगस्टलासुद्धा शासनाने उत्तर सादर न करता पुन्हा दोन आठवड्यांची मुदत वाढवून मागितली. या विलंबामागे हिशेबाची जुळवाजुळव हे प्रमुख कारण सांगितले जाते. ४४ बंद टोल नाक्यांच्या परताव्याचा हिशेब जुळविताना कार्यकारी अभियंत्यापासून बांधकाम सचिवापर्यंत सर्वांचीच पंचाईत झाली आहे. अर्थ खात्याने नुकसानभरपाईच्या प्रस्तावाला अद्यापही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हिशेबाबाबत अधिकाऱ्यांचे एकमत होऊ शकलेले नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने थातूरमातूर हिशेब जुळवून ३०७ कोटींच्या नुकसानभरपाईचा आकडा पुढे केला होता. याच आकड्यावर अवलंबून राहून शासनाने घाईतच टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता अर्थ खात्याची पूर्व मंजुरीही घेतली गेली नाही. त्यामुळे तारखांवर तारखा घेण्याची वेळ बांधकाम खात्यावर आली आहे. इकडे टोल बंद झाल्याने या कंत्राटदारांचे बँक कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. विविध रस्त्यांच्या विकासासाठी उचललेले कोट्यवधींचे कर्ज कसे फेडावे हा प्रश्न या कंत्राटदारांपुढे आहे. शासनाने उच्च न्यायालयात आपली बाजू न मांडता पुढील तारीख घेऊन पुन्हा या कंत्राटदारांची घोर निराशा केली आहे. आता दोन आठवड्यानंतर तरी शासन परताव्याचा हिशेब सादर करते का याकडे नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)