ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. २० - प्रेम प्रकरणातून दलित समाजाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना नेरूळ येथे घडली आहे. या तरुणाच्या हत्येवरून नेरूळ परिसरात तणाव असून पोलिसांनी अतिरिक्त कर्मचारी मागवून विभागात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.
नेरुळच्या एसबीआय कॉलनीत राहणाऱ्या स्वप्नील सोनवणे याचे दारावे गावातील आगरी समाजच्या १४ वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यांच्या प्रेमाची माहिती मुलीच्या भावाला मिळाली होती. यावरून मुलीच्या भावाने साथीदारांसह स्वप्नीलच्या घरी जाऊन धमकी दिली होती तसेच घरी येऊन माफी मागण्याची मागणी केली होती.
स्वप्नीलचे कुटुंबीय मुलीच्या घरी गेले असता त्यांना जबर मारहाण झाली होती. यामारहाणीत जखमी झालेल्या स्वप्नीलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.