शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दलित सरपंचाचा खून

By admin | Updated: May 7, 2014 05:49 IST

हमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील एका दलित युवकाच्या हत्येची धग कायम असतानाच बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील दलित सरपंच मनोज कसाब यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे.

जालना : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील एका दलित युवकाच्या हत्येची धग कायम असतानाच बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील दलित सरपंच मनोज कसाब यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी माजी उपसरपंच गणेश चव्हाणसह आठ आरोपींनी अटक केली असून, अजून तिघांचा शोध सुरू आहे. या घटनेने मराठवाड्यासह राज्यभर संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती, अशी नानेगावातील ग्रामपंचायत व अंगणवाडीच्या बांधकामावरून सरपंच मनोज कसाब व माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच ३ एप्रिल रोजी सरपंच कसाब यांना मारहाण करण्.यात आली होती. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केल्याचे खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तेथे येऊन सांगितल्यानंतर हा मृतदेह अंत्यविधीसाठी नानेगाव येथे नेण्यात आला. लात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी, गणेश धोंडिबा चव्हाण, बाबूराव धोंडिबा चव्हाण, उमेश गणेश चव्हाण, किशोर गणेश चव्हाण, संतोष महादू शिंदे, पमू डिगांबर चव्हाण, तुकाराम डिगांबर चव्हाण, डिगांबर रामचंद्र चव्हाण, बद्री कृृष्णा चव्हाण, कृष्णा रघुनाथ चव्हाण, बळीराम कृष्णा चव्हाण यांच्याविरुद्ध ३०२ व अ‍ॅट्रा्रसिटीचा गुन्हा दाखल केला. रुग्णवाहिका पाहून खळबळ मुख्य प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या या रुग्णवाहिकेमुळे परिसरात खळबळ उडाली. मृतदेह घेऊन आलेल्या सुमारे दीडशे जणांनी जिल्हा कचेरीसमोरच रस्त्यावर निदर्शने केली. मंगळवारी राजाबाग दर्गा उरूसमुळे जिल्'ात सरकारी सुटी असल्याने कार्यालयात कुणीही हजर नव्हते. मात्र या प्रकाराची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह या तातडीने ताफ्यासह तेथे पोहोचल्या. पोलीसांनी सांगितले, की कसाब व माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांच्यासह समर्थकांत गेल्या काही महिन्यांपासून वाद-विवाद सुरू होता. विशेषत: गावअंतर्गत राजकारणच त्यास कारणीभूत आहे. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत बांधकाम का केले म्हणून मारहाण झाल्याचे नमूद करीत संबंधितांनी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. २०१० मध्ये मनोज कसाब हे सरपंच झाले होते.