बार्शी : जवखेड (अहमदनगर) येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आरोपींच्या अटकेसाठी पुरोगामी पक्ष व संघटनांतर्फे रविवारी येथील तहसील कार्यालयावर दोन स्वतंत्र मोर्चे काढण्यात आले. निवासी नायब तहसीलदार उत्तम पवार यांनी निवेदन स्वीकारले. संबंधित खटला जलदगती न्यायालयात चालवावा, गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेस व पुरोगामी पक्षांतर्फे करण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी बसपाने केली. (प्रतिनिधी)
दलित हत्याकांड; सर्वपक्षीय मोर्चा
By admin | Updated: November 17, 2014 03:49 IST