शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणासाठी संघ ‘दक्ष’!

By admin | Updated: December 10, 2015 02:23 IST

राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.

मुंबई : राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.जल संवर्धन करणाऱ्या २३ संस्थांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात बंधारे बांधणे, जल आराखडा तयार करणे, नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्याची कामे संघ करणार असल्याचे संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सांगितले. कुलकर्णी म्हणाले की, १२ जिल्ह्यांमध्ये सात कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्पांचे नियोजन केले आहे. शिवाय औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांचा गट सक्रीय झाल्याचेही त्यांनी सांगितले.दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यांची समस्या मोठी गंभीर असल्याने पुढील १८० दिवस विविध ७० चारा डेपोंच्या माध्यमातून पशूखाद्य पुरवणार असल्याचेही संघाने स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याच्या बचतीचे आणि संवर्धनाचे उपाय सांगणारे जनजागृतीपर उपक्रम राज्यातील ५०० गावांमध्ये राबवण्याचे कामही संघाचे स्वयंसेवक करणार आहेत. शिवाय दुष्काळग्रस्त भागांतील जे विद्यार्थी शहरात शिकतात, त्यांच्यासाठी पुढील सहा महिने भोजनाची सोयही संघ करणार असल्याचे सेवा विभागाने सांगितले.> दोन नद्यांना मिळणार पुनरूज्जीवन : संघाने हाती घेतलेल्या उपक्रमात राज्यातील दोन नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयोग संघ करणार आहे. त्यात सांगलीची अग्रणी नदीसह पैठण तालुक्यातील येळ गंगाजवळील नदीचा समावेश आहे.कर्जमाफी नाही मागणार : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करणार नसल्याचेही संघाने सांगितले. लोकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिकाही संघाने स्पष्ट केली. त्यासाठीच लोकांनी या उपक्रमात सामील होऊन आणि औद्योगिक संस्थांनीही आर्थिक मदत करून, उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन संघाने केले आहे.