शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडच्या मंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 10:55 IST

दगडूशेठ गणपती हा देश-परदेशातील भक्तांचा लाडका बाप्पा आहे.

ठळक मुद्देलाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान साडेचार फुटांची मूर्ती असून फायबरमध्ये नीलेश पारसेकर यांनी बनवली

लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान : साडेचार फुटांची मूर्ती असून फायबरमध्ये नीलेश पारसेकर यांनी बनवली पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे सर्व गणेशभक्तांचे श्रद्धास्थान. लाडक्या बाप्पाचे दर्शन परदेशातही घडावे, यासाठी थेट थायलंडमधील मंदिरात हुबेहूब दगडूशेठ बाप्पांसारखी मूर्ती विराजमान होणार आहे. ही मूर्ती साडेचार फुटांची असून फायबरमध्ये बनवली आहे. नीलेश पारसेकर यांनी ही मूर्ती बनवली आहे. मुखेडकर यांनी ही मूर्ती रंगवली आहे. नितीन करडे यांनी मुकुट, परशू, कान, शुण्डाभूषण, गळ्यातील हार असे विविध दागिने बनविले आहेत. मूर्ती काल थायलंडला रवाना झाली. दगडूशेठ गणपती हा देश-परदेशातील भक्तांचा लाडका बाप्पा आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांनाही बाप्पाचे दर्शन घेण्याची नेहमीच ओढ असते. त्यामुळे नागरिकांच्या पुढाकाराने थायलंडमधील बँकॉक येथील लक्ष्मी-नारायण मंदिरामध्ये गणपतीचे मंदिर बांधून तेथे या हुबेहूब दगडूशेठ गणपतीसारख्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. थायलंडच्या नागरिकांमध्ये दगडूशेठ बाप्पांविषयी विशेष प्रेम आहे. परंतु, प्रत्येकालाच पुण्यामध्ये येऊन बाप्पांचे दर्शन घेता येत नाही. त्यांना त्यांच्याच शहरामध्ये बाप्पाचे दर्शन घेता यावे आणि बाप्पाची पूजा करता यावी, अशी थायलंडवासीयांची इच्छा होती, यासाठी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नुकतीच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी थायलंड येथील धनंजय, उमेश, नीळकंठ, गंगा, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी उपस्थित होते. 

दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असलेली मूर्ती चांदीची असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. मुकुट, शुण्डाभूषण, दोन कमळे, दोन शस्त्रे, परशू, कान, हार, चक्र आदींचा समावेश आहे. यासाठी साडेतेरा किलो चांदी वापरण्यात आली आहे. साधारणपणे दीड महिना दागिन्यांचे काम सुरू होते. मी या क्षेत्रामध्ये २८ वर्षांपासून कार्यरत आहे.- नितीन करडे, सराफ, आर्टिकल सेंटर...थायलंडमधील काही नागरिक एप्रिल महिन्यात माझ्याकडे आले होते. ते सर्व जण दगडूशेठ गणपतीचे भक्त आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडे चौकशी केल्यावर त्यांनी माझे नाव सुचवले. हाताशी कमी वेळ असल्याने मातीकामापासून सुरुवात करणे अवघड होते. माझ्याकडे तयार असलेले मॉडेल मी त्यांना दाखवले आणि त्यांना पसंत पडले. मार्बल पावडर, फायबर असे दर्जेदार साहित्य वापरण्यात आले आहे. मूर्तिकार म्हणून हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. मी जीडी आर्ट केले असून, २० वर्षांपासून प्रत्यक्ष काम करीत आहे.- नीलेश पारसेकर, मूर्तिकार

टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरThailandथायलंड