शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी मोकाट का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:44 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास समाधानकारक नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय व सीआयडीला फैलावर घेतले.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास समाधानकारक नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय व सीआयडीला फैलावर घेतले. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला महाराष्ट्रात अटक होते, मग दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकºयांना अटक करण्यात अपयश का, असा संतप्त सवाल करीत न्यायालयाने सीबीआय सहसंचालक व राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना समन्स बजावले.सीबीआय व सीआयडीने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे तपास अहवाल सादर केला. मात्र, तो असमाधानकारक असल्याने न्यायालयाने तपास यंत्रणांना धारेवर धरले. गौरी लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारे याला कर्नाटक एसआयटीने महाराष्ट्रातून अटक केली. मग दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकºयांना अटककरण्यास सीबीआय व सीआयडी तत्पर नाही का, असाही सवाल न्यायालयाने केला. दाभोलकर, पानसरे हत्येचातपास प्रामाणिकपणे झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याचे आमचे कर्तव्य आहे,’ असेही न्यायालयाने सुनावले.देखरेखीखाली तपास व्हावादाभोलकर व पानसरे यांच्या हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी करणाºया याचिका दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात दाखल केल्या.हत्या झाल्या कधी?दाभोलकर यांची हत्या २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात करण्यात आली. तर पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले. मात्र २० फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.