शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

डी. जी. इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्याला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 03:37 IST

डी. जी. इन्फ्रास्ट्रक्चर या गॅल्वाईज पत्रे उत्पादन करणाऱ्या कारखाना प्रशासनाने रातोरात कारखान्याला टाळे ठोकून गाशा गुंडाळला.

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील विस्तारित कक्षातील डी. जी. इन्फ्रास्ट्रक्चर या गॅल्वाईज पत्रे उत्पादन करणाऱ्या कारखाना प्रशासनाने रातोरात कारखान्याला टाळे ठोकून गाशा गुंडाळला. कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना व्यवस्थापनाने कारखाना बंद केल्यामुळे सुमारे ८२ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या बेकायदा टाळेबंदीच्या विरोधात कामगारांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.विशेष म्हणजे या कारखान्यात काम करणारे बहुतांश कामगार हे स्थानिक असल्याने या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. बुधवारी रात्री अचानक कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कारखाना बंदची नोटीस लावून कारखान्याला टाळे ठोकले. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार कामावर आले असता कारखाना बंद असल्याचे सांगण्यात आले. या कारखान्यात कामगार उत्कर्ष सभा आणि भारतीय कामगार सेना अशा दोन कामगार संघटना कार्यरत असून व्यवस्थापनाने करारानुसार पगारवाढ केली नसल्याने कामगार उत्कर्ष सभेचे युनिट अध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. या कारखान्यात उत्पादित केलेले पत्रे व अन्य उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मात्र कारखान्याला रातोरात कुलूप ठोकून व्यवस्थापनाने गाशा गुंडाळल्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)>या कारखान्यातील कामगारांना अंधारात ठेवून व्यवस्थापनासमोर कारखाना बंद करण्याचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून कामगारांवर अन्याय करणारा आहे.- माजी आ. माणिक जगताप, उपाध्यक्ष, कामगार उत्कर्ष सभा