मुंबई : राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत सायबर लॅब उभारण्यात येणार असून त्यासाठी ११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्याच्या नूतन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. राज्यात सर्वत्र सायबर गुन्हे वाढत आहेत. सायबर लॅब नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास होण्यास विलंब होतो ही बाब दीक्षित यांनी निदर्शनास आणून दिली. सायबर लॅबसाठी १८ कोटी मंजूर करण्यात आले असले तरी आपल्याला फक्त ११ कोटींचीच गरज आहे, असे दीक्षित यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे राज्याचे ७ कोटी रुपये वाचवल्याबद्दल मुनगंटीवार यांनी दीक्षित यांचे कौतुक केले. राज्यातील पहिले स्मार्ट पोलीस ठाणे बल्लारपूर या मुनगंटीवार यांच्या गावी उभे राहणार आहे.पोलीस दलात आजमितीला ५५०० पदे रिक्त असून ती भरण्यासाठी लवकरच मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.
सर्व जिल्ह्यांत होणार सायबर लॅब
By admin | Updated: October 9, 2015 01:50 IST