शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

गुन्हे रोखण्यासाठी उभारणार सायबर फोर्स

By admin | Updated: August 16, 2016 01:39 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकीकडे पारदर्शी कारभार करतानाच राज्यातील जनतेची सुरक्षितता व मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकीकडे पारदर्शी कारभार करतानाच राज्यातील जनतेची सुरक्षितता व मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, डॉ. विजयसतबीर सिंह, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध) ब्रिजेश सिंह उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, देशाची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू आहे. इंटरनेटच्या अधिकाधिक वापरामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण व पद्धतीही वाढल्या आहेत. या गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी एक हजार पोलिसांना प्रशिक्षित करून भक्कम सायबर फोर्स तयार करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत राज्यात ४२ ठिकाणी सायबर लॅब सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातील सर्व पोलीस ठाणी एकमेकांना जोडण्यात आली आहेत. पुणे येथे आॅनलाईन तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील गुन्ह्यांचा शोध तातडीने लावण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची क्षमता वाढविण्यात येत आहे. या सायबर लॅबचा वापर खासगी बँका व इतर संस्थांना सेवा पुरविण्यासाठी करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माहिती तंत्रज्ञानाने देश जोडला जात असताना ते तोडण्याचे काम हॅकर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बिघडविण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘सायबर लॅब’चा उपयोग होणार असल्याचे पोलीस महासंचालक माथूर यांनी सांगितले.तर, औद्योगिक सुरक्षेसाठी सायबर हा प्रकल्प महत्वाचा असून हाय स्पीड फायबर आॅप्टिक केबल नेटवर्कने सर्व लॅब जोडण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिली. (प्रतिनिधी)राज्यात सायबर लॅबचे जाळे विणण्यात येत असून ४२ सायबर लॅब सुरू झाल्या आहेत. यापुढे दहशतवादविरोधी पथक, विशेष गुन्हे शाखा, गुन्हे शोध पथक आदी कार्यालयांमध्ये सायबर लॅब सुरु केल्या जातील. सी-डॅक या संस्थेने अवघ्या २१ दिवसांत ४२ लॅबचे काम पूर्ण केल्याचे गृहविभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी प्रास्ताविकात सांगितले.