शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांचा ताबा बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 05:19 IST

कोरेगाव भीमा हिंसाचार : न्यायालयाचे मत, माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक

मुंबई : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांचा ताबा बेकायदेशीर असल्याचे सकृतदर्शनी मत उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदविले.

व्यवसायाने वकील असलेले सुरेंद्र गडलिंग यांच्यासह सुधीर ढवळे, सोमा सेन, रोमा विल्सन, महेश राऊत या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. पुणे न्यायालयाने २ सप्टेंबरला अर्ज स्वीकारत पोलिसांना संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ दिली.

पुणे न्यायालयाच्या या निर्णयाला सुरेंद्र गडलिंग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागण्याकरिता सरकारी वकिलांनी न्यायालयात अहवाल सादर करायचा असतो. तसेच आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ का हवी आहे, याची कारणमीमांसा देणे आवश्यक आहे. मात्र, या केसमध्ये पुण्याचे पोलीस सहायक आयुक्त शिवाजी पवार यांनी अहवाल सादर केला आणि सरकारी वकिलांनी केवळ शिक्का मारला. मुदतवाढ का हवी आहे, याची कारणे दिली नाहीत, असे गडलिंग यांनी याचिकेत म्हटले.

न्या. भाटकर यांनी गडलिंग यांनी दिलेले तांत्रिक मुद्दे योग्य ठरविले. आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून का हवी आहे, याची ठोस कारणे देण्यात आली नाहीत. कायद्यानुसार, आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागताना सरकारी वकिलांनी अहवाल तयार करून सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, या केसमध्ये तपास अधिकाऱ्याने अहवाल तयार केला. त्यामुळे अर्जदाराचा ताबा बेकायदेशीर आहे, असे माझे सकृतदर्शनी मत आहे, असे न्या. भाटकर यांनी म्हटले.गेल्या ३१ डिसेंबरला पुण्याच्या शनिवारवाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद होती. त्यानंतर दुसºयाच दिवशी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला. दोन दिवस महाराष्ट्र बंद होता. परिषदेला माओवाद्यांनी आर्थिक रसद पुरविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही रसद सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, रोमा विल्सन, महेश राऊत यांनी पुरविल्याच्या संशयावरून पोलिसांनी पाचही जणांना ६ जून रोजी अटक केली.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारHigh Courtउच्च न्यायालय