सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : येथील राजवाड्यातून चोरी झालेल्या तोफप्रकरणी पोलिसांनी २५ संशयीतांना ताब्यात घेतले आहे. याप्रकणी पाच पथके वेगवेगळ्य़ा ठिकाणी रवाना झाली आहेत.दरम्यान, याप्रकरणी शासनाने राजवाड्यात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या राजवाड्यामधील राजे लखोजीराव जाधवाच्या कार्यकाळातील १६ व्या शतकामधील पंचधातुची ८५ किलो वजनाची तोफ २२ डिसेंबर रोजी रात्री चोरीस गेली आहे. घटनेपासून डीवायएसपी समीर शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुर्यकांत बांगर व त्यांचे सहकारी अंगुली मुद्रा तज्ञ, अकोला येथील श्वान पथक येथे ठाण मांडून बसले आहे. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पाच पथक वेगवेगळ्य़ा भागात पाठविण्यात आली असून जवळपास पंचविस संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु असल्याची माहिती समीर शेख यांनी दिली. अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही. पुरातत्व विभागाचे नागपूर येथील अधिकारी मोठे व वस्तु संग्रहालयाचे डॉ.एम.वाय.कठाणे यांनीसुद्धा येथे तळ ठोकला आहे. आता या वस्तू संग्रहालयात सीसीटिव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राजवाड्यामधील तोफ चोरी प्रकरणी २५ संशयीत ताब्यात
By admin | Updated: December 25, 2014 01:23 IST