कारंजा लाड (वाशिम): अल्पवयीन मुलीच्या छेडखानीनंतर कारंजा येथे काही गटांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनांच्या पृष्ठभूमिवर लावण्यात आलेली संचारबंदी शुक्रवारी, चवथ्या दिवशीही कायमच होती. या संचारबंदीत दुपारी ३.३0 वाजतापासून काही तास शिथिलता देण्यात आली होती.एका अल्पवयीन मुलीची अल्पवयीन मुलाने छेड काढल्याची घटना कारंजा येथे १४ जुलै रोजी घडली होती. संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत एका जणाचा मृत्यू झाला होता. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती, तेव्हापासून ती कायम आहे. शुक्रवारी, चवथ्या दिवशी दुपारनंतर काही तास शिथिलता देण्यात आली होती. कारंजात शांतता असली तरी, परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे.
कारंजातील संचारबंदी आणखी शिथील
By admin | Updated: July 18, 2015 01:21 IST