शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ ही क्रूरताच

By admin | Updated: December 31, 2015 01:14 IST

सार्वजनिक ठिकाणी पत्नीशी व्यवहार करताना तिची बदनामी होईल, अशी भाषा वापरणे आणि सातत्याने तिला शिवीगाळ करणे, ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी पत्नीशी व्यवहार करताना तिची बदनामी होईल, अशी भाषा वापरणे आणि सातत्याने तिला शिवीगाळ करणे, ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने ३० वर्षीय महिलेला तिच्या ४४ वर्षीय पतीपासून घटस्फोट दिला.काव्या पटेल (बदलेले नाव) या ३० वर्षीय महिलेचा २०१० मध्ये हर्षद पटेल (बदलेले नाव) याच्याशी विवाह झाला. हर्षदचा याआधीही त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. काव्याबरोबर विवाह झाल्यानंतर हर्षदने त्याची सगळी मालमत्ता पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाच्या नावावर केली. विवाह झाल्यानंतर लगेचच या दोघांमध्ये वाद सुरू झाले. काव्याने केलेल्या अर्जानुसार, हे दोघेही इजिप्तला हनीमूनसाठी गेल्यावर हर्षदने तिच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीवरून वाद घालणे सुरु केले. विवाहापूर्वीच हर्षदला या सवयीची पूर्ण जाणीव दिली होती, तरीही हर्षदने चारचौघांत सिगरेट ओढण्यावरून इजिप्तमध्ये भांडण केले. त्यानंतर ती ओडिशामध्ये कौटुंबिक सोहळ््यासाठी गेली असता तिथेही हर्षदने तिच्या नातेवाईकांसमोर वाद घालणे सुरु करत तिची बदनामी केली. तसेच खूप शिवीगाळही केली. याप्रकारामुळे काव्याची आईही कमालीची दुखावली गेली. याचिका दाखल करण्यात आल्यानंतर कुटुंब न्यायालयाने हर्षदला यावर त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र हर्षदने काहीच प्रतिसाद न दिल्याने या याचिकेवरील सुनावणी एकतर्फी झाली. ‘पत्नीने केलेल्या आरोपांना आव्हान देण्यात आले नाही. त्यामुळे पती क्रूर आणि शिवीगाळ करणारा असल्याचे सिद्ध झाले,’ असे म्हणत कुटुंब न्यायालयाने काव्याचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. (प्रतिनिधी)