शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पतीला कामाच्या ठिकाणी सतत फोन करणे क्रूरताच

By admin | Updated: September 25, 2015 03:36 IST

पतीशी सतत किरकोळ कारणांवरून भांडणे, वारंवार आत्महत्येची धमकी देणे, त्याच्या कामाच्या ठिकाणी फोन करून कामात व्यत्यय आणणे,

मुंबई : पतीशी सतत किरकोळ कारणांवरून भांडणे, वारंवार आत्महत्येची धमकी देणे, त्याच्या कामाच्या ठिकाणी फोन करून कामात व्यत्यय आणणे, तसेच मित्रपरिवारात बदनामी करण्यासाठी त्याचे मेल हॅक करून अश्लील मेल पाठवणे, हे पत्नीचे वर्तन म्हणजे एक प्रकारची क्रूरताच आहे, असे निरीक्षण नोंदवत कुटुंब न्यायालयाने अवघे चार महिने एकत्र राहिलेल्या दाम्पत्याचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. ३०वर्षीय पतीने पत्नीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी अर्ज केला होता.अजय मेहता (बदललेले नाव) आणि अनिषा मेहता (बदललेले नाव) यांचा विवाह ३१ मार्च २०११ रोजी झाला. मात्र चार महिन्यांतच अजयला अनिषापासून घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयाची पायरी चढावी लागली. अजय यांच्या म्हणण्यानुसार, अनिषा लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या गुरूच्या सांगण्यावरून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. विवाह होऊन चार महिले उलटले तरी या दोघांमध्ये शारीरिक संबंध आले नाहीत. किरकोळ कारणावरून अनिषा सतत भांडते आणि आत्महत्या करण्याची धमकी देते, असेही आरोप अजय यांनी त्यांच्या पत्नीविरोधात केले. मात्र अनिषा यांनी हे सगळे आरोप नाकारले. अजय अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत आहे आणि यासाठीच आपण शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, असे अनिषाने न्यायालयाला सांगितले. अनिषा घटस्फोट द्यायला तयार आहे, मात्र तिच्या वडिलांनी लग्नासाठी आणि वैद्यकीय चाचणीसाठी केलेला खर्च लक्षात घेता तिला कायमस्वरूपी पोटगी द्यावी, अशी मागणी अनिषाच्या वकिलांनी न्यायालयापुढे केली.अजयच्या अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्याच्या मागणीबद्दल तिने नातेवाईक किंवा तिच्या मित्रपरिवाला कल्पना दिली नाही. त्यामुळे तिच्या या ‘कहाणी’वर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पतीबरोबर शारीरिक संबंध न ठेवण्यासाठी तिच्याकडे कोणतेच योग्य कारण नाही. त्यामुळे तिची वर्तवणूक म्हणजे एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत कुटुंब न्यायालयाने अजयना दिलासा दिला. त्याचप्रमाणे अनिषाला कायमस्वरूपी पोटगी देण्यास नकार दिला. ‘अनिषा घटस्फोट घेण्यास तयार आहे, मात्र यासाठी तिने कायमस्वरूपी पोटगी देण्याची अट घातली आहे. ही अट पाहता, तिला केवळ अर्जदाराकडून पैसे उकळायचे आहेत, हे स्पष्ट होते. ती म्हणते म्हणून तातडीने पोटगी देता येणार नाही. न्यायालयाला मुद्दे निश्चित करावे लागतील. त्यानंतरच पोटगी देण्यात येईल,’ असे म्हणत कुटुंब न्यायालयाने अनिषाला दिलासा देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)