शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

निवडणुकीसाठी राज्यात सीआरपीएफचे अकरा हजारांवर जवान तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 06:16 IST

गुरुवारी नक्षलग्रस्त भागात होणाऱ्या मतदानासाठी ८८ सुरक्षा कंपन्यांसह वायू दलाची एमएस-१७ ही तीन हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.

- जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता एक दिवसावर येऊन ठेपल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याबरोबरच मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवळपास ११० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ११ हजारांवर जवानांचा समावेश असून मतदान होईपर्यंत त्यांना विभागवार नेमण्यात येणार आहे.

गुरुवारी नक्षलग्रस्त भागात होणाऱ्या मतदानासाठी ८८ सुरक्षा कंपन्यांसह वायू दलाची एमएस-१७ ही तीन हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. येथील निवडणूक बंदोबस्तावर पर्यवेक्षण करण्यासाठी नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अप्पर महासंचालक राजेंद्र सिंह तर गोंदियासाठी या अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांना नेमण्यात आले असल्याचे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ जागांसाठी चार टप्प्यांत मतदान होत आहे. या कालावधीत आचारसंहितेचा भंग न होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व घटकप्रमुखांना विशेष सूचना केल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघातील बंदोबस्तावर नियोजन करण्यासाठी पोलीस मुख्यालयात महानिरीक्षकांच्या समन्वयाखाली विशेष कक्ष तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात सव्वा लाख पोलिसांशिवाय राज्य सुरक्षा दल, होमगार्ड आणि केंद्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या कंपन्यांना पाचारण करण्यात आले आहे. एका कंपनीत सरासरी १०० ते ११० जवानांचा समावेश असून अशा ११० कंपन्या राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत येथे कार्यरत राहणार आहेत.

ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, तेथील आयुक्तालय/ अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलिसांना तीन दिवसांच्या कालावधीतील साप्ताहिक सुट्टी व वैद्यकीय रजा वगळून अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय संबंधित हद्दीमध्ये निवडणूक होईपर्यंत नाकाबंदी लावली जाणार आहे.गडचिरोलीत सीआरपीएफच्या ३५ तर एसआरपीएफच्या २८ आणि गोंदियामध्ये सीआरपीएफच्या १५ तुकड्या तैनात केल्या आहेत. 

राज्यातील जनतेने निर्भयपणे मतदान करून आपला हक्क बजवावा. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कसलीही तमा बाळगली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आलेले आहेत.- सुबोध जायसवाल,पोलीस महासंचालक