शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील सर्वपक्षीयांची मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘एसपीए’ पळविले पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 03:15 IST

मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा कोणताही मोठा प्रकल्प औरंगाबादेत येण्यापूर्वीच त्याला पळवून नेण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील शिखर समजली जाणारी ‘आयआयएम’ संस्था नागपूरला पळवून नेण्यात आली.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा कोणताही मोठा प्रकल्प औरंगाबादेत येण्यापूर्वीच त्याला पळवून नेण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील शिखर समजली जाणारी ‘आयआयएम’ संस्था नागपूरला पळवून नेण्यात आली. त्या मोबदल्यात स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट (एसपीए) ही संस्था औरंगाबादला देण्यात आली होती. ही संस्थाही पुण्याला पळवून नेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.आयआयएम नागपूरला नेल्यानंतर मराठवाड्याच्या जनतेने तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मराठवाड्याचा रोष लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्वरित स्कूल आॅफ प्लॅनिंग ही संस्था देण्याचे आश्वासन दिले. आता औरंगाबादहूनही ही संस्था पुण्याला नेण्यात आल्यास आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही. त्यासाठी तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत वाल्मी येथील कार्यक्रमात एसपीए औरंगाबादला मंजूर झाल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्रीच प्रकाश जावडेकरांना ही संस्था पुण्याला नेण्यासाठी पत्र देत असतील, तर गंभीर बाब आहे. हा अन्याय आपण होऊ देणार नाही. जावडेकरांनाही पत्र पाठवून ही प्रक्रिया थांबविण्यात येईल. गरज पडली तर सेना स्टाईल आंदोलनही करण्यात येईल, असे खा. चंद्रकांत खैरे म्हणाले.शिवसेना-भाजपा युतीने नेहमीच मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागील तीन वर्षांमध्ये या विभागावर फक्त आणि फक्त अन्याय शासनाने केला आहे. मी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. युतीला भरभरून मतदान करणाºया जनतेने याचा कुठेतरी विचार करावा, असे आमदार सतीश चव्हाण म्हणाले. तर सर्व काही पुण्याला देणार असाल, तर या भागाचा विकास कसा होईल.?याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. या मुद्यावर सेना, राष्टÑवादी आदी पक्षांना सोबत घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी आंदोलन उभे करण्यात येईल, असे आ. इम्तियाज जलील यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस