शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कुरकुंडीत तिहेरी हत्याकांड

By admin | Updated: March 29, 2017 00:28 IST

खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे कौटुंबिक वादातून तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांच्या मदतीने

पाईट : खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे कौटुंबिक वादातून तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांच्या मदतीने वडील, सावत्रआई व सावत्र बहिणीची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी घराजवळील चरामध्ये एकावर एक तीनही मृतदेहांवर शेणखत टाकून गाडून टाकले. दीपक रोहिदास गोगावले (वय २१ ) याने हे हत्याकांड केले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.कुरकुंडी येथील राळेवस्तीजवळील येथील यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष रोहिदास बाळू गोगावले (वय ४५), त्यांची पत्नी मंदा रोहिदास गोगावले (वय ४०) व मुलगी अंकिता रोहिदास गोगावले (वय १२) शनिवारपासून (दि. २५) बेपत्ता होते. याबाबत शेजाऱ्यांनी मंदा हिच्या वडिलांना सांगितले. त्यांनी चाकण पोलिसांना कळविले. पोलिसांनी चौकशी केली असता, घरासमोरील पडवीमध्ये रक्ताचे डाग दिसून आले. यावरून हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. मात्र मृतदेह न मिळाल्याने नेमक्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत.मंगळवारी सकाळी घरापासून १०० फूट अंतरावर एका मृतदेहाचा एक हात दिसून आला. तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणीच शोध घेतला. एक महिला व पुरुष असे दोन मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. परंतु तहसीलदार किंवा तत्सम कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करावयाचा असल्याने ते येईपर्यंत मृतदेह त्या ठिकाणाहून बाहेर काढले नाहीत. दरम्यान, तिसऱ्या मृतदेहाबाबत काय झाले असेल? याबाबत अनेक तर्क वाढविले जात होते. परंतु जेव्हा मृतदेह बाहेर काढण्यात आले, तेव्हा तिसरा मृतदेहही तिथे सापडला. दरम्यान, पोलिसांनी यांचे जवळचे नातेवाईक कोण आहेत, याबाबत चौकशी केली असता रोहिदास गोगावले यांना पहिली पत्नी होती. तिला दोन मुले होती. दीपक व शुभम अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांना येथे बोलावून घेतले. चौकशी केली असता, दीपक येथे येऊन गेल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता दीपक उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी जाब विचारल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, चाकण पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. नायब तहसीलदार लता वाजे यांच्यासमक्ष मृतदेह काढण्यात आले. संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश मुंडे, अनिल पाचपुते, सी. गवारी, अजय भापकर आदी तपास करीत आहेत. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. निर्घृण कृत्यरोहिदास याचा एक हात पंजापासून तुटलेला होता, तर डोक्यावर, हातावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. पत्नी मंदा व मुलगी अंकिता यांच्या हातावर, डोक्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. महिलांच्या  डोक्यावरील  केस कापण्यात आले होते. पोलिसांचा तपास सुरू : खऱ्या कारणांचा शोधया कुटुंबाला एकत्रितपणे इतक्या निर्घृणपणाने का संपवले असावे याची खरी कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. परंतु अद्याप नेमके कारण उ़घड झालेली नाही. मात्र कौटुंबिक वादातूनच हे खून झाले असल्याचा संशय आहे. हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील आरोपी दीपक गोगावले हा त्यांच्या घरी आलेला होता. तो त्यांच्या घरी कधीही फारसा येत नसे. त्याने घरातील गाईंना चारादेखील खाण्यासाठी दिला. परंतु तो त्या ठिकाणी काही पुरावे सुटलेले नाहीत ना याची शहानिशा करण्यासाठी आलेला असावा असा पोलिसांना संशय आहे.