शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

बीआरटी मार्गात अपघातसत्र

By admin | Updated: May 16, 2016 01:03 IST

नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे

चंदननगर : नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.१४) दिवसभरात नगर रस्त्यावर बीआरटीमार्गात विविध ठिकाणी तीन विचित्र अपघात झाले. सर्वप्रथम खराडी दर्गा या ठिकाणी खासगी चारचाकी वाहन बीआरटी- मार्गात घुसले व त्याने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला उडविले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरा अपघात रामवाडी विमानतळ पोलीस स्टेशन समोरील ठिकाणी झाला. या बसने ज्येष्ठाला उडविले. यात ज्येष्ठ गंभीर जखमी झाला. तिसरा अपघात इनॉर्बिट मॉल समोरील सोमनाथ नगरला जाणाऱ्या फाट्यात झाला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने या बसने बीआरटीची सीमाभिंत व सिग्नलचा चक्काचूर केला. यात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटीच्या मार्गात जाण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे; मात्र बीआरटी मार्गाच्या नकाशात हा फाटाच नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे या ठिकाणी सोमनाथनगरला जाणारा रस्ता बनविण्यात आला आहे. हा रस्ता बंद केल्यास, अपघात होणार नाही. नगर रस्ता बीआरटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, योग्य पद्धतीने जनजागृती न केल्याने नुकसान, अपघात होत आहेत. बीआरटी मार्ग हा खासगी वाहनांसाठी नसून, तो फक्त बससाठी आहे. मात्र, मार्गात सर्रास खासगी वाहने घुसत आहेत. नेमलेल्या वार्डनलाही खासगी वाहनचालक जुमानत नाहीत. नगर रस्त्यावरील पथदिवेही रात्रीच्या वेळी बंद असतात. (वार्ताहर)जनजागृतीचीही आवश्यकताबसचालकही बेफाम बस चालवित आहेत. त्यांच्या वेगालाही मर्यादा असल्या पाहिजेत. रामवाडीत विमानतळ पोलीस स्टेशन समोर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे टाकले आहेत. मात्र, बसचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी अधिक अपघात होत आहेत. याच ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून पाचवा अपघात घडला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, पुढल्या महिन्यात शाळा सुरू झाल्यावर, मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सध्या शाळांना सुट्या आहेत. रामवाडीतील रामजी मालोजी आंबेडकर व लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय या शाळेत ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वडगाव शेरीला जाण्यासाठी सर्व मुले त्यांचा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असतात. त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा, मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागणार आहे.