शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे

By admin | Updated: June 5, 2015 01:15 IST

राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहे.

उस्मानाबाद : राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व बँकांना पत्र देऊन मागेल त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत सूचना केल्या आहेत. यानंतरही पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.जिल्ह्णातील ढोकी, तेर, सारोळा येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या कामांची फडणवीस यांनी गुरूवारी पाहणी केली. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य दुष्कामुक्त करण्याचा शासनाने संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठीच जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या माध्यमातून सध्या राज्यातील सहा हजार गावांमध्ये ७० हजार कामे सुरू आहेत. हा उपक्रम पाच वर्षे राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकवाटा महत्वाचा असून, गावागावातून जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जी गावे लोकवाटा जमा करून कामे सुरू करतील, त्यांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर ‘पाच जिल्ह्णातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’, अशी मागणी केली होती. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, शरद पवार यांच्या नेतृवाखालील शिष्टमंडळाने भेटून वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. यातील अनेक गोष्टी शासनाकडून करण्यात येत आहेत. कर्जाच्या पुनर्गठणासाठी ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. पहिल्या वर्षी शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारचे व्याज घेतले जाणार नाही. तर दुसऱ्या वर्षी १२ पैकी ६ टक्के व्याज हे शासन भरणार आहे. त्यामुळे ‘आम्ही पहिल्या वर्षी सातबारा कोराच केला आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाच वर्षांचा कालावधीराज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असून पहिल्या वर्षी कृषी कर्जावर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कोणतेही व्याज घेतले जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कर्जाच्या पुनर्गठणासाठी ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला असून शेतकऱ्यांना फायदा होईल.