शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

यू ट्यूब चॅनेलविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:35 IST

खोटे व्हिडिओ अपलोड करून दिवंगत मोतीलाल नेहरूंपासून ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबाबत या चॅनेलवरून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे.

लोणी (जि. अहमदनगर) : गांधी-नेहरू परिवारासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबाबत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका यू ट्यूब चॅनेलविरुद्ध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुरुवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खोटे व्हिडिओ अपलोड करून दिवंगत मोतीलाल नेहरूंपासून ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबाबत या चॅनेलवरून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. चॅनेलने अपलोड केलेल्या एका व्हिडिओत काँग्रेस पक्ष व पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत धादांत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून गांधी-नेहरू परिवाराची बदनामी केली जात आहे, असे विखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.विखे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ अ, २९५ अ नुसार सामाजिक तेढ निर्माण करणे, धर्म, वंश, जन्मस्थान, निवास आदी कारणांवरून शत्रुत्व वाढविणे, कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याच्या कारणावरून यू ट्यूब चॅनेलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.- रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक

टॅग्स :YouTubeयु ट्यूब