शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

युनायटेड इन्शुरन्सच्या दोन अधिकाऱ्यांसह दहा जणांविरुध्द सीबीआयकडून गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 20:47 IST

येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य आठ एजंट आणि वाहनधारकांविरुध्द सीबीआयने न्यायालयात गुन्हे दाखल

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 23 - येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य आठ एजंट आणि वाहनधारकांविरुध्द सीबीआयने न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपघात झाल्यानंतर मागच्या तारखेने वाहनांचा विमा उतरवून कंपनीची फसवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने लातूरच्या विमा वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सेंट्रल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टीगेशन अर्थात् सीबीआयच्या वतीने वेबसाईटवर काढण्यात आलेल्या बुलेटीननुसार लातूर जिल्ह्यातील सोळा वाहनांच्या विमा चुकीच्या पध्दतीने देऊन ३ कोटी २५ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. २००९ ते २०१४ या काळात जिल्ह्यातील १६ अपघातग्रस्त वाहनांना विमा नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मागच्या तारखेने कर्मचाऱ्यांनी विमा उतरवून दिला होता. या बेकायदेशीर कामामुळे कंपनीचे सव्वा तीन कोटीचे नुकसान केल्याचा दोन कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यासह या प्रकरणात गुंतलेल्या एजंट आणि वाहनधारकांचा समावेशही आरोपीत असल्याचे सांगण्यात आले. या सर्वांविरुध्द न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार कलम १२० (ब), भादवि ४२०, ४६८, ४७७ (अ) आणि पीसी अ‍ॅक्ट १९८८ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सीबीआयच्या प्रसिध्दीपत्रकानुसार असाच घोटाळा उस्मानाबाद, जळगाव, औरंगाबाद आणि नांदेड येथील युनायटेड इन्शुरन्सच्या शाखांनी झाल्याचे म्हटले आहे. आरोपींची नावांची माहिती नाही : विभागीय व्यवस्थापक अष्टेकर लातूर न्यायालय आणि युनायटेड इन्शुरन्सच्या लातूर शाखेतून यातील आरोपींची नावे मिळू शकले नाहीत. विमा कंपनीच्या लातूर शाखेचे विभागीय शाखा व्यवस्थापक पांडुरंग अष्टूरकर यांनी माध्यमांना माहिती देण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे सांगितले. याबाबत विमा कंपनीच्या चेन्नई येथील मुख्य शाखेला संपर्क साधवा, असे सांगितले. आमच्याही कानावर आले आहे. अधिकृतपणे आम्हाला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून काहीही बोलण्यास नकार दिला. लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातही हा गुन्हा गोपनीय असल्याची चर्चा होती.