शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पोलीस दलात निर्माण व्हावी विश्वासार्हता

By admin | Updated: January 9, 2016 04:04 IST

प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने उत्तम नेतृत्व देऊन कनिष्ठांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, त्यांना न्यायबुद्धीने वागणार असल्याची खात्री द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

पुणे : प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने उत्तम नेतृत्व देऊन कनिष्ठांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, त्यांना न्यायबुद्धीने वागणार असल्याची खात्री द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वर्षभरामधील गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत केले.सर्वसामान्यांच्या छोट्यातल्या छोट्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्याचे तसेच आगामी काळात ‘कोअर पोलिसिंग’ वाढवण्याचे आदेशही त्यांनी दिले. कुंभपर्व, गणेशोत्सव, ईद यांसह सर्वच सण व उत्सवांमध्ये पोलिसांनी शांतता अबाधित ठेवण्यात यश मिळविले. प्रभावी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्वसामान्य माणूस तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात यावा, यासाठी तेथील वातावरण मोकळे हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करताना पारदर्शकता ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक, दलितांबाबतच्या गुन्ह्यात संवेदनशील राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एक लाख घरे बांधणारतीन वर्षांमध्ये पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्यात येणार असून, पुणे आणि नवी मुंबईमध्ये १५ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. जमिनीची खरेदी पूर्ण झाली आहे. नवी मुंबईत ९० एकर जमीन घेतली आहे. तेथे पोलीस कर्मचारी आणि सहायक फौजदारांसाठी घरे असतील, अशी माहिती अतिरिक्त सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी दिली. पोलिसांचा ‘केआरए’ मुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागांसाठी ‘केआरए’ आखून दिला होता. गृहविभागाला पोलिसांना तीन वर्षांत एक लाख घरे, दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे, सीसीटीएनएस व पुण्याचा सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करणे, मुंबईमधील सीसीटीव्ही प्रकल्पाला गती देणे, कोणालाही कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सुविधा देणे, महिला आणि बालकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करणे अशी १३ उद्दिष्ट्ये देण्यात आली होती. दोषसिद्धीचे प्रमाण १६वरून ४८ टक्क्यांवर गेले आहे. मुंबईमधील साऊथ झोनचा सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित झाला आहे, असे बक्षी म्हणाले.