शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

‘पंचामृत मोदका’ची क्रेझ

By admin | Updated: September 5, 2016 03:25 IST

गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य अशी ओळख असलेल्या मोदकाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत प्रचंड झुंबड उडाली आहे

ठाणे : गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य अशी ओळख असलेल्या मोदकाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत प्रचंड झुंबड उडाली आहे. यंदा स्पेशल फ्लेवर्सचे मोदक बाजारात नव्याने पाहायला मिळत असून त्यापैकी ‘पंचामृत मोदक’ खास आकर्षण ठरले आहे.मोदक खरेदी करायला येणारे ग्राहक पंचामृत मोदकांनाच पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नेहमीच्या मावा, मलई मोदकांपेक्षा आंबा मोदक जास्त हिट ठरले आहे. अवघ्या एक दिवसावर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. यानिमित्त केल्या जाणाऱ्या खरेदीची लगीनघाई सुरू आहे. मखर, पूजेचे साहित्य, हारफुले, सजावटीचे साहित्य अशा खरेदीबरोबर महत्त्वाची खरेदी असते, ती मोदकांची. बाजारपेठेत भक्तांच्या खरेदीला उत्साह आला आहे. गर्दीची झुंबड उडाली आहे. मिठाईच्या दुकानांत तर भक्तांची रीघ लागली आहे. एरव्ही, पाच मिनिटांत होणाऱ्या या खरेदीला अर्धा-पाऊणतास भक्तांना थांबावे लागत आहे. मावा मोदकामध्ये खस, थंडाई, लिची-कोकोनट, जायफळ, कंदी, आंबा मावा हे मोदक असून ५०० ते ६०० रुपये किलोंना मिळत आहेत. मलई मोदकांमध्ये आंबा, पिस्ता, स्ट्रॉबेरी, अंजीर, रोझ हे मोदक असून ६४० ते ६८० रुपये किलो दराने मिळत आहेत. काजू मोदकामध्ये प्लेन काजू, केशर, ड्रायफ्रूट, अंजीर हे मोदक असून ते ८०० ते १००० रुपये किलो दराने मिळत आहेत. स्पेशल फ्लेवर्समध्ये चंदन, केवडा, केशर, गुलाब, खस या पाच फ्लेवर्सचा मिळून असलेला ‘पंचामृत मोदक’ यंदा नवीनच पाहायला मिळत आहे. काजू, गुलाब, गुलकंद यांचा एकत्र फ्लेवर्स असलेला मोदक, मलई कुल्फी मोदक, बटरस्कॉच, रिअल रोझ पत्ती मोदक हे नवीन प्रकार मोदकांमध्ये पाहायला मिळत आहेत. ६०० ते ७०० रुपये किलोने हे मोदक मिळत आहे. ज्यांना दरवर्षी मोदकांमधील नावीन्य शोधण्याची इच्छा असते, ते ग्राहक स्पेशल फ्लेवर्सकडे वळतात, असे केदार जोशी यांनी सांगितले. गतवर्षीपेक्षा यंदा १० टक्क्यांनी दरात वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दरवर्षीप्रमाणे कडक बुंदीचे मोदकदेखील पाहायला मिळत आहेत. या मोदकांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मागणी असते. यात १०० ग्रॅमपासून पाच किलोपर्यंतचे मोदक आहेत. याची किंमत ५० रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आहे. एक आठवड्यापासून या मोदकांचे बुकिंग सुरू होते, असे जोशी यांनी सांगितले. धकाधकीच्या जीवनात मोदक घरी करणे प्रत्येकाला शक्य होते, असे नाही. त्यामुळे रेडिमेड मोदकखरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. यंदा उकडीच्या मोदकांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. कोणी एक हजार तर कोणी दोन हजार मोदकांची आॅर्डर्स घेतली आहे. गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी आॅर्डर्स घेणे बंद केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.मावा, मलई, काजू मोदकांपेक्षा उकडीच्या मोदकांना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे हमखास या मोदकांची खरेदी होते. १०० ग्रॅम वजनाचा उकडीचा मोदक बनवला जातो. यंदा हा मोदक २० रुपये प्रतिनग मिळत आहे. गतवर्षी या मोदकाची किंमत १८ रुपये होती, असे जोशी यांनी सांगितले.