शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दोन डॉक्टरांना न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: January 28, 2017 04:20 IST

डॉक्टरांवर नाहक फौजदारी कारवाई करून कायद्याचा गैरवापर करण्यात आला आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने

मुंबई : डॉक्टरांवर नाहक फौजदारी कारवाई करून कायद्याचा गैरवापर करण्यात आला आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पुण्याच्या दोन डॉक्टरांवर पीसीपीएनडीटी (प्री-कन्सेप्शन अ‍ॅण्ड प्री-नटाल डायग्नोस्टिक टेक्निक्स अ‍ॅक्ट) अंतर्गत नोंदवलेली तक्रार रद्द केली. पिंपरीच्या एका रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ असलेले राजेंदर सुजन्याल आणि त्याच रुग्णालयाला भेट देणारे रेडिओलॉजिस्ट श्रीपाद इनामदार यांच्यावर पीसीपीएनडीटी अंतर्गत नोंदवण्यात आलेली केस न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी रद्द केली.पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टचे पालन केले जाते की नाही, हे तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने रुग्णालयाला भेट दिली. एका महिन्यानंतर अधिकाऱ्यांनी फॉर्म-एफ नीट न भरल्याचा दावा करत, रुग्णालयाची अल्ट्रा साउंड मशिन सील केली. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गरोदर महिलेची सोनोग्राफी केल्यानंतर फॉर्म-एफवर रेडिओलॉजिस्टची सही असणे बंधनकारक आहे. मात्र, या केसमध्ये फॉर्मवर स्त्रीरोगतज्ज्ञाने सही केली आहे. याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. हस्तलिखित फॉर्मवर रेडिओलॉजिस्टचीच सही आहे. मात्र, संगणकावरून प्रिंटआउट काढलेल्या फॉर्मवर सुजन्याल यांची सही आहे. कारण ते रुग्णालयाचे प्रमुख आहेत. तक्रारदारांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. संगणकावरून प्रिंटआउट घेतलेल्या फॉर्मवर रेडिओलॉजिस्टचीच सही असणे बंधनकारक आहे. त्याची सही नसल्याने कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे आहे, अशी कायद्यातील तरतूद न्यायालयासमोर सिद्ध करता आली नाही. त्यामुळे मशिन जप्त करणे आणि नाहक फौजदारी गुन्हा नोंदवणे म्हणजे कायद्याचा गैरवापर करण्यासारखे आहे, असे निरीक्षण न्या. प्रभुदेसाई यांनी नोंदवले. (प्रतिनिधी)