शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी मोर्चा : पर्ल्स गुंतवणूकदारांची सेबीवर धडक, पैसे परत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:33 IST

पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला.

मुंबई : पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. पर्ल्स कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप संघटनेच्या अध्यक्षा सुनंदा कदम यांनी मोर्चावेळी केला आहे.कदम म्हणाल्या की, आॅस्ट्रेलिया येथील हॉटेल शेरेटॉन मिराज या मालमत्तेच्या विक्रीतून सुमारे ४०० कोटी रुपये तेथील न्यायालयाच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जमा आहेत. मात्र सेबीच्या हलगर्जीपणामुळे तेथील पैसा भारतामध्ये आणण्यास विलंब होत आहे. सेबीने कंपनीच्या ६ कोटी गुंतवणूकदारांच्या रकमेचा परतावा व्याजासह करण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे सेबीच्या मनमानी कारभारामुळे ‘पर्ल्स प्रकरणातून सेबी हटाव’ आंदोलन करण्यात आले.सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे ६ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. चार वर्षांपूर्वी कंपनीविरोधात सीबीआय व सेबीने चौकशी सुरू केली. या प्रकरणी ९० दिवसांमध्ये कंपनीच्या मालमत्तांची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांची समिती स्थापन करून कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाला दोन वर्षे उलटल्यानंतरही समितीकडे केवळ ३७० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांच्या हक्काचे पैसे परत देण्यासाठी सेबी तांत्रिक पद्धतीने टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.