शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशातले पहिले नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार; पिशवीमागे ७५० रुपये वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 08:20 IST

कृषी केंद्रात येणार खत, पिकांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी नत्र, स्फूरद आणि पालाश या तीन घटकांची आवश्यकता असते. डीएपीमध्ये हे तीनही घटक याेग्य प्रमाणात उपलब्ध असतात. 

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : देशातले पहिले द्रव्य रूपातील नॅनो डीएपी खत यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रारंभी नॅनो युरिया शेतकऱ्यांच्या हातात पडला. आता नॅनो डीएपी खत शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. यामुळे एका पोत्यामागे शेतकऱ्यांची ७५० रुपयांची बचत होणार आहे. 

पिकांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी नत्र, स्फूरद आणि पालाश या तीन घटकांची आवश्यकता असते. डीएपीमध्ये हे तीनही घटक याेग्य प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे दरवर्षी डीएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात होते; परंतु, याचे दर अधिक असतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडते. यावर्षी प्रथमच नॅनो डीएपी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे १,३५० रुपयांची खताची बॅग नॅनो डीएपीमुळे ६०० रुपयांत लिक्विडमध्ये बॉटल उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पोत्यामागे ७५० रुपये वाचणार आहेत.

डीएपी लिक्विडच्या पाच कोटी बॉटल लिक्विड स्वरूपातील नॅनो डीएपी देशभरात उपलब्ध होणार आहे. यात पाच कोटी बॉटल्सची निर्मिती होणार आहे. पुढील दोन वर्षांत नॅनो डीएपीच्या १८ कोटी बॉटल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गुजरातमधील कांडला आणि ओरिसातील पारादीप कारखान्यात नॅनो डीएपीची निर्मिती केली जात आहे. 

नॅनो डीएपीची अधिसूचना प्रसिद्धनॅनो डीएपी निर्मितीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. रासायनिक खताच्या अती वापराने जमिनीचा पोत खराब होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. आता द्रव स्वरूपातील नॅनो डीएपी फवारणीतून देता येणार आहे. यामुळे पौष्टिकता, गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासोबत आर्थिक भार कमी होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.

राज्यभरात नॅनो डीएपी उपलब्ध होणार आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाचे पत्रही जिल्ह्यांना मिळाले आहे. खताच्या यादीमध्ये नॅनो डीएपीचा समावेश आहे. - अमोल राजगुरू, जिल्हा पणन व्यवस्थापक, यवतमाळ.