शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
5
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
6
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
7
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
8
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
9
कंबर, मान, खांद्यामध्ये असह्य वेदना; दुर्मिळ आजारामुळे १२ किलोने वाढला स्तनांचा आकार
10
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
11
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
12
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
13
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
14
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
15
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
16
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
17
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
18
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
19
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
20
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!

भ्रष्टाचाराचा कोथळा काढणारच

By admin | Updated: February 19, 2017 05:26 IST

तबेलेवाले, टोणगे, उपरे म्हणून उत्तर भारतीय अन् बिहारी बांधवांना हिणवणाऱ्या तसेच गुजराती बांधवांबद्दल वाट्टेल ते लिहिणाऱ्या शिवसेनेकडे आता या सगळ्यांना वाईट म्हणण्याची

मुंबई : तबेलेवाले, टोणगे, उपरे म्हणून उत्तर भारतीय अन् बिहारी बांधवांना हिणवणाऱ्या तसेच गुजराती बांधवांबद्दल वाट्टेल ते लिहिणाऱ्या शिवसेनेकडे आता या सगळ्यांना वाईट म्हणण्याची हिंमतच उरलेली नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईतील शेवटच्या प्रचारसभेत शिवसेनेला डिवचले. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा कोथळा मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असून इतरांचा राग करण्याची आमची संस्कृती नाही. गेल्या तीन पिढ्यांपासून मुंबईत स्थिरावलेले सर्व भाषिक लोक हे मुंबईकरच आहेत. ते गणेशोत्सव, गोविंदा साजरा करतात; मराठीही बोलतात. ते आपल्याच संस्कृतीचा भाग झाले आहेत, म्हणूनच छठ पूजेला जाण्याची मला कुठलीही लाज वाटत नाही. आपल्या सरकारच्या काळात त्यांच्याकडून हप्ते वसूल करण्याची कोणाची हिंमत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. सोमय्या मैदानावरील या सभेत मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय कार्ड खेळले. उत्तर भारतीय, बिहारी, दाक्षिणात्य आणि गुजराती मतदारांच्या व्होट बँकेच्या भावनांना हात घालतानाच मुंबई मराठी माणसांची आहे आणि राहील. माझा आत्मा अन् स्वाभिमानही मराठी आहे. मराठी माणसाच्या नावावर इतकी वर्षे शिवसेनेने केवळ भावनात्मक राजकारण केले. आता ते दिवस संपले आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. निरानरसिंगपूरचे नृसिंह हे माझे कुलदैवत आहे. त्यांनी हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढला होता तसाच मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा कोथळा मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सारी कोशिश है की सुरत बदलनी चाहिए,’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबईत परिवर्तन तर होणारच असा विश्वास व्यक्त केला. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपाचे हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा तसेच शिवसेना पक्ष प्रमुखांच्या प्रकृतीचा विचार करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे कधीही चांगले, असा चिमटाही पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला.या आधी तुम्हीच भाजपाला न मागता पाठिंबा देऊ केला होता, तो कशासाठी? शिवाय विरोधकांची जागाही शिवसेनेने घेतली. ती जागा देखील तुमच्या पक्षाला मिळवता आली नाही असे का झाले?, असा सवाल केला असता ते म्हणाले, राज्यात विधानसभेच्या निवडणुका सगळेच पक्ष वेगवेगळे लढले होते. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पुन्हा निवडणुका घेणे राज्याच्या हिताचे नव्हते. शिवाय भाजपाचे सरकार होऊ दिले नसते तर आम्ही त्यांना संधी मिळू दिली नाही, असाही आरोप झाला असता, म्हणून त्यावेळी सरकार स्थिर रहावे यासाठी मी ती भूमिका घेतली होती. आमच्या पक्षाच्या सगळ््या नेत्यांनी एकत्रित बसून धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणून आम्ही गप्प बसलो. आता दोन अडीच वर्षांत जनतेला भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात कळाले आहेत. शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर किती घनिष्ठ प्रेम आहे. हे त्या दोघांना आणि राज्यातील जनतेलाही कळाले आहे. त्यामुळे आता राज्यात निवडणुका घेण्यास चांगले वातावरण आहे, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)‘एसआरए’मध्ये ३०५ चौ.फुटाचे घरझोपडपट्टी पुनर्विकास योजनेत (एसआरए) सध्या २६९ चौरस फुटांचे घर दिले जाते. यापुढे ३०५ चौरस फुटाचे घर दिले जाईल. विमानतळ, वनजमिनींवर ५० हजार घरे बांधली जातील. कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचे स्वतंत्र धोरण आणणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.पुण्यातील सभा रद्द करावी लागली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, एखादी सभा रद्द झाली तर फरक पडत नाही. जनतेने तुम्हाला (शिवसेना व इतर पक्ष) रद्द करण्याचे ठरविले आहे.वाघाचे काढले दातमी वाघ नाही, पण तुमच्या गुहेत घुसून मारण्याचे शंभर सिंहांचे बळ मला सामान्य माणसांकडून मिळाले आहे. त्या ताकदीवर मी वाघाचे दात बाहेर काढू शकतो. वाघाचा पंजा तुम्ही मला दाखवू नका मी घाबरत नाही.