शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोरा’तील भ्रष्टाचार पोलीस ठाण्यात, भाजपा आमदाराने दिली तक्रार, सा. बां. खात्याने काम न करताच उचलले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:02 IST

मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवासात आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले कंत्राटदारांना देण्यात आल्याची तक्रार आता भाजपाच्याच एका आमदाराने कफ परेड पोलीस ठाण्यात करीत

- यदु जोशीमुंबई : मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवासात आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले कंत्राटदारांना देण्यात आल्याची तक्रार आता भाजपाच्याच एका आमदाराने कफ परेड पोलीस ठाण्यात करीत सार्वजनिक बांधकाम विभागाला घरचा अहेर दिला आहे.तब्बल २८ आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करताच अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने सरकारी खजिन्याची लूट करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांनी हा प्रश्न लावून धरला आहे. या घोटाळ्याप्रकरणी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, उपअभियंता बी. एस. फेगडे आणि शाखा अभियंता के. डी. धोंगडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, असे वाघमारे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. मनोरा आमदार निवासाची इमारत लवकरच पाडण्यात येऊन त्या ठिकाणी नवी टोलेजंग इमारत सरकार बांधणार आहे. एकदा इमारत पाडली की तेथे झालेला भ्रष्टाचार आपोआपच गाडला जाईल, या भावनेने भ्रष्टाचार करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.निर्णयासाठी फाइल मंत्र्यांकडेमनोरा आमदार निवासातील घोटाळ्याप्रकरणी प्रज्ञा वाळके, बी. एस. फेगडे आणि के. डी. धोंगडे या तीन अधिकाºयांविरुद्ध पोलिसात एफआयआर नोंदविण्याची लेखी परवानगी बांधकाम विभागाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पाटील त्याबाबत कधी निर्णय घेतात याची उत्सुकता आहे.ज्या कंत्राटदारांना कामे न करताच बिलांची रक्कम अदाकरण्यात आली त्यांचा उल्लेख पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. त्यात, मे. मनीष एस. कंजन; मुलुंड, मे. शिवगिरी कन्स्ट्रक्शन; नवी मुंबई, आरना कन्स्ट्रक्शन; शिवडी आणि सुस्वागत कंपनीयांचा समावेश आहे.मनोºयातील घोटाळ्याप्रकरणी बी. एस. फेगडे आणि के. डी. धोंगडे यांना आधीच निलंबित करण्यात आले आहे. तथापि, कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावरही चौकशी अहवालात ठपका ठेवलेला असताना त्यांची केवळ बदली करण्यात आली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार