शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक विशाल कोतकरला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:03 IST

केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला़

अहमदनगर : काँग्रेसचा कार्यकर्ता रवी खोल्लम याच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली़ या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेला नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिसांना दिली़ कोतकर याला विशेष पथकाने मंगळवारी पहाटे नगर शहराजवळ अटक केली़ न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला़ मात्र, ज्याच्या सांगण्यावरून हत्या झाली तो विशाल कोतकर फरार होता़ या हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून विशाल याचे नाव पोलिसांच्या तपासात समोर आले होते. गुन्हे शाखेची टीम गेल्या १७ दिवसांपासून त्याचा शोध घेत होती़ शिवसैनिक कोतकर व ठुबे यांना मारण्याचे मी अथवा इतर कुणी गुंजाळ याला सांगितले नव्हते,अशी माहिती विशाल कोतकर याने पोलिसांना दिली आहे़ कोतकर याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोतकर याला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.भाजप आमदार कर्डिले यांना जामीन मंजूरकेडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला. या प्रकरणी आ. जगताप यांचे सासरे व भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. कर्डिले सध्या न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना मंगळवारी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. साक्षीदारावर दबाव आणायचा नाही, दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Kedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड