शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नागरिकांचा जीव जाऊ नये म्हणून लोकल प्रवासावर निर्बंध, राज्य सरकारची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 07:57 IST

Coronavirus in Maharashtra: कोरोनाकाळात मुंबईतील लोकल प्रवासावर घातलेल्या निर्बंधांबाबत स्पष्टीकरण देताना राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की, एक कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, याची खात्री करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. 

मुंबई :  कोरोनाकाळात मुंबईतील लोकल प्रवासावर घातलेल्या निर्बंधांबाबत स्पष्टीकरण देताना राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की, एक कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, याची खात्री करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्य सरकारने लसीकरण न केलेल्या  नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मनाई केली, अशी माहिती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला शुक्रवारी दिली.

लसीकरण न झालेल्या व्यक्तींना लोकल, मॉल व अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्यास मनाई करण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. तसेच राज्यघटनेचे अनुच्छेद १९ (१)(डी)चे उल्लंघन करणारा आहे. देशात कुठेही वावरण्याचे स्वातंत्र्य  असताना राज्य सरकारच्या निर्णयाने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीत राज्य सरकारने निर्णयाच्या समर्थनार्थ म्हटले की, सरकारने घातलेले निर्बंध वाजवी आहेत आणि सगळ्यांच्या भल्यासाठी आहेत. ‘माझ्या नागरिकांचा मृत्यू होणार नाही, हे पाहणे एक कल्याणकारी राज्य म्हणून माझी जबाबदारी आहे. कोणाचाही मृत्यू होऊ नये, त्यात याचिककर्त्यांचाही समावेश आहे, असे मला वाटते,’ असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे अंतुरकर यांनी न्यायालयात केला.सरकारला एका व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्य, निवड व अधिकारांपेक्षा अनेकांच्या भल्याचे पाहण्याचा अधिकार आहे. जरी याचिकदाराने म्हटले की त्याला त्याच्या जिवाची फिकीर नाही, तरीही राज्य सरकारला त्याचा जीव वाचविण्याचा अधिकार आहे आणि अन्य नागरिकांचाही... असा युक्तिवाद अंतुरकर यांनी केला.राज्य सरकारने ज्या बैठकीत कोरोनासंदर्भात प्रमाणित कार्यप्रणाली ठरवतेवेळी, ज्यात लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला, त्या बैठकीचे इतिवृत्तान्त सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तज्ज्ञांनी सारासार विचार करून ते निर्बंध लादले का? हे पाहायचे होते. आम्हाला महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची चिंता आहे. सरकारने नागरिकांच्या सर्व शंका दूर केल्या पाहिजेत; कारण, सरकारने म्हटले आहे की ते जनतेचे ‘पालक’ म्हणून अधिकार लागू करीत आहेत, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे