शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाग्रस्त पोलिसांवर मोफत उपचार; महासंचालकांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 04:24 IST

कोरोनाचा महाराष्ट्र पोलीस आरोग्य कुटुंब योजनेत समावेश

- जमीर काझी मुंबई : कोविड - १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढणाऱ्या पोलिसांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्यास त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जाणार आहेत.पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत या विषाणूचा समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत सर्व रुग्णालये आणि पोलीस घटक प्रमुखांना कळविण्यात आले आहे.आतापर्यंत ६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पोलिसांना होणारा संसर्ग यामुळे या विषाणूचा समावेश अत्यावश्यक बाब म्हणून योजनेत करण्याचा निर्णय पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतला आहे.पोलीस दलाच्या यादीत असलेल्या राज्य भरातील विविध जिल्हावार रुग्णालयामध्ये कोविड - १९ संदर्भात उपचार केले जातील. त्यासाठी संबंधितांना केवळ आपल्याकडील आरोग्य योजनेचे कार्ड दाखवावे लागेल.सदैव कामाची दगदग आणि तणावाखाली वावरणाºया पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येत नाही. हे लक्षात घेता १५ वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत औषधोपचार उपलब्ध करून देणारी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित केली. यात विविध २८ आजार व ५ गंभीर स्वरूपाच्या व्याधीचा समावेश आहे. कोरोनाबाधित पोलिसांना आर्थिक मदत म्हणून तातडीने एक लाख रुपये अग्रिम स्वरूपात देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. मात्र, ही रक्कम ठरावीक हप्त्यात बिनव्याजी परत करावी लागेल. त्यामुळे पोलिसांना ठोस मदत व विनामूल्य उपचार मिळावेत यासाठी मोफत आरोग्य कुटुंब योजनेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.६४ पोलिसांना लागणआतापर्यंत १२ पोलीस अधिकारी व ५२ पोलीस कर्मचारी मिळून ६४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १३४ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक झाली आहे.कोरोनाला थोपविण्यासाठी प्रयत्नशील असताना काही अधिकारी, अंमलदारांना त्याची लागण झाली आहे. त्यांच्यावर विनामूल्य उपचार होण्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून कोविंड-१९ चा महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत समावेश केला आहे.- संजीव कुमार सिंघल,अप्पर पोलीस महासंचालक, प्रशासन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या